AB de Villiers Special Advice to Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव हा जागतिक क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. सुरुवातीला, त्याचा फलंदाजीचा पराक्रम फक्त आयपीएलमध्येच दिसला होता, परंतु आता सूर्याचा हा कारनामा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही दिसून येतो. तो आपल्या शॉट खेळण्याच्या क्षमतेने सर्वांना प्रभावित करत आहे. चौकारांचा दमदार स्वीप असो किंवा थर्ड मॅनला षटकार मारण्याची अतुलनीय खेळी असो, या फलंदाजाने हे सिद्ध केले आहे की, तो खरोखर 360-डिग्रीचा खेळाडू आहे.
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून सूर्यकुमार वनडे संघाचा भाग आहे. मात्र, अशी फलंदाजी करण्याची क्षमता असलेला सूर्यकुमार हा पहिलाच खेळाडू नाही. त्याच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महान खेळाडू एबी डिव्हिलियर्सने ही कामगिरी केली आहे. खुद्द दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज सूर्यकुमारच्या फलंदाजीने प्रभावित झाला आहे. तथापि, सर्व फॉरमॅटमध्ये सातत्य राखणे हे भारतीय स्टारसाठी सर्वात मोठे आव्हान असेल, असे त्याचे मत आहे.
“सर्व फॉरमॅटमध्ये सातत्य राखणे महत्त्वाचे –
सूर्यकुमार यादवबद्दल बोलताना एबी डिव्हिलियर्स म्हणाला, “सर्व फॉरमॅटमध्ये सातत्य राखणे आणि कसोटी क्रिकेट, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये त्याचा खेळ ओळखणे आणि त्याच्यासाठी काय उपयुक्त आहे, हे समजून घेणे हे त्याचे सर्वात मोठे आव्हान असेल. मला वाटते. हे सर्व अगदी सारखेच आहे. मला वाटते की ते अविश्वसनीय आहे.”
तो खेळत असताना त्याला पाहणं खूप छान वाटतं –
एबी डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, “तो असे शॉट मारत आहे, जे मी कधीच खेळले नाहीत. त्यामुळे तो खेळत असताना त्याला पाहणं खूप छान वाटतं. माझ्या मते, त्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि बरेच काही करायचे आहे. मला वाटते की, भविष्यात आणखी चांगले खेळाडू असतील, त्यामुळे ते खूप रोमांचक आहे.”
सूर्यकुमार यादवची कारकीर्द –
सूर्यकुमार यादवने ४८ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये ४६.५२ च्या सरासरीने आणि १७५.७६ च्या स्ट्राइक रेटने १६७५ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने तीन शतके आणि १३ अर्धशतकं झळकावली आहेत. त्याचबरोबर २३ एकदिवसीय आणि कसोटी सामना खेळला आहे.