AB de Villiers said Punjab Kings release of Sam Curran could have saved a lot of money : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) माजी दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सने सॅम कुरनला आयपीएलमध्ये १८ कोटींहून अधिक रक्कम मिळाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. पंजाब किंग्सने आयपीएल २०२३ च्या लिलावात सॅम करनला १८ कोटी ५० लाख रुपयांना खरेदी केले होते. त्यावेळी तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू देखील होता, परंतु त्याची कामगिरी तितकी चांगली नव्हती. डिव्हिलियर्सच्या मते, पंजाब किंग्जचा संघ सॅम करनला जास्त पैसे देत आहे.
आयपीएल २०२३ च्या लिलावादरम्यान सॅम करनसाठी खूप महागडी बोली लावली गेली असली तरीही, तो त्यानुसार कामगिरी करू शकला नाही आणि बहुतेक सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला. सॅम करनने आयपीएल २०२३ मध्ये १४ सामन्यांत केवळ १० विकेट घेतल्या आणि तो खूप महागडा ठरला. पंजाब किंग्जचा संघ सॅम करनला आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी रिलीज करेल,अशी सर्वांना अपेक्षा होती. कारण तो खूप महागडा ठरला आहे, पण संघाने तसे केले नाही.
सॅम करनला संघातून रिलीज करायला हवे होते – एबी डिव्हिलियर्स
एबी डिव्हिलियर्सच्या मते, पंजाब किंग्स सॅम करनसाठी खूप पैसे खर्च करत आहेत. त्याच्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान तो म्हणाला, ” मी वादग्रस्त असे काहीही म्हणत नाही पण माझ्या मते, सॅम करनला गेल्या काही वर्षांपासून खूप पैसे मिळत आहेत. तो वाईट खेळाडू नाही आणि मला तो खूप आवडतो. विश्वचषकात त्याने चांगली कामगिरी केली होती, पण ती काही वर्षांपूर्वीची होती.”
एबी डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, “त्याची अलीकडची आयपीएलमधील कामगिरी चांगली राहिली नाही. इंग्लंडसाठीही तो विशेष काही करू शकला नाही. गेल्या काही वर्षांपासून त्याला अधिक पैसे मिळत आहेत. मात्र, पंजाब किंग्सला हवे असते, तर ते त्याला रिलीज करुन त्यांच्या पर्समधील बरेच पैसे वाचवू शकले असते.”
हेही वाचा – BBL 2023 : जमान खानच्या धारदार यॉर्करवर ग्लेन मॅक्सवेल काही कळण्याच्या आत झाला ‘क्लीन बोल्ड’, पाहा VIDEO
आगामी आयपीएल हंगामासाठी पंजाब किंग्जचा संघ: शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम करन, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंग, शशांक सिंग, तनय थियागराजन, प्रिन्स चौधरी, रिले रौसो.