AB de Villiers Statement on Yuzvendra Chahal: या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी बीसीसीआयने आगामी आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा केली. पुढील आठवड्यात पाकिस्तान आणि श्रीलंकेत ही स्पर्धा सुरू होणार आहे. आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली, ज्यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर उपस्थित होते. यावेळी त्याने विश्वचषक संघ आशिया चषकासाठी निवडलेल्या संघासारखाच असेल असे संकेत दिले.

केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचा संघात समावेश केल्याने चाहते आणि संघ व्यवस्थापनाला दिलासा मिळाला आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असणाऱ्या या दोन्ही खेळाडूंच्या आगमनामुळे भारतीय संघाची मधली फळी चांगलीच बळकट झाली आहे. आगरकरने असेही सांगितले की अय्यर तंदुरुस्त आहे, तर केएल राहुलला आशिया चषकाच्या पहिल्या काही सामन्यांसाठी बाहेर राहू शकतो.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
KL Rahul Statement on Sanjiv Goenka Animated Chat in IPL 2024 loss Said Wasn’t the nicest thing Ahead
KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’

मात्र, संघ निवडीदरम्यान निवडकर्त्यांनी काही आश्चर्यकारक निर्णय घेत लेगस्पिनर युजवेंद्र चहलला संघातून वगळले. यानंतर चहलला वगळण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचवेळी व्यवस्थापनाने कुलदीप यादवला त्याच्या जागी पहिल्या संघात ठेवले. आता दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डिव्हिलियर्सने चहलला संघातून वगळण्याच्या निर्णयावर मोठे वक्तव्य केले आहे.

हेही वाचा – The Hundred: सदर्न ब्रेव्हजविरुद्ध जोस बटलरने केला कहर! वादळी खेळीच्या जोरावर मँचेस्टर ओरिजिनल्सला पोहोचवले अंतिम फेरीत

आशिया चषक संघातून युजवेंद्र चहलला वगळल्याने एबी डिव्हिलियर्स निराश –

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार, जो त्याच्या आयपीएल कार्यकाळात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा भाग होता, त्याने त्यावेळी चहलसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली होती. आशिया कपसाठी चहलला संघात स्थान न मिळणे निराशाजनक असल्याचे तो म्हणाला. एबी डिव्हिलियर्सने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, “चहलला वगळण्यात आले आहे, निवडकर्त्यांनी त्यांचे इरादे स्पष्ट केले आहेत की ते कोणाची निवड करतील. माझ्यासाठी हे थोडे निराशाजनक आहे, युजी नेहमीच खूप उपयुक्त आहे आणि तुमच्या संघात लेग स्पिनिंगचा पर्याय असणे खूप छान आहे. तो किती कुशल आहे हे आम्हाला माहीत आहे.”

हेही वाचा – Asian Games स्पर्धेसाठी VVS Laxman सांभाळणार भारतीय पुरुष संघाची धुरा, तर ऋषिकेश कानिटकरकडे महिला संघाची जबाबदारी

मागील काही कालावधीमध्ये एकदिवसीय फॉर्मेटमध्ये युजवेंद्र चहलची कामगिरी काही खास राहिलेली नाही. नुकत्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पार पडलेल्या मालिकेत त्याला एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. टी-२० मध्ये, चहलने दोन सामन्यांमध्ये ९.०५ च्या महागड्या इकॉनॉमी रेटने पाच विकेट घेतल्या.