मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) सचिवपदी अभय हडप यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत हडप यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सूरज सामत यांना १९६-१४१ अशा फरकाने पराभूत केले. या निवडणुकीत ३३७ सदस्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अजिंक्य नाईक हे ‘एमसीए’च्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर सचिवपद रिक्त झाले होते. विशेष म्हणजे हडप आणि सामत दोघेही कार्यकारी परिषदेचे सदस्य असल्याने आता पुन्हा एकदा लवकरच ‘एमसीए’मध्ये निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.

‘‘माझा आनंद शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मी कधी ‘एमसीए’चा सचिव होईन असा विचारही केला नाही. आता या पदावर आल्यावर पायाभूत सुविधा आणि मैदान कर्मचाऱ्यांसाठी मला खूप काही गोष्टी करायच्या आहे. माझा हा विजय मैदान क्लबचे सचिव आणि क्रिकेटपटूंमुळे झाला आहे. माझ्याकडे आता एका वर्षाचा कालावधी आहे. मुंबई क्रिकेट आणि मैदानांसाठी हा कार्यकाळ पुरेसा आहे. मी आता अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि कार्यकारी परिषदेच्या सदस्यांसह मुंबई क्रिकेटला आणखी उंचीवर नेण्यासाठी मेहनत करेन,’’ असे हडप यांनी सांगितले.

Mohammed Shami on Rohit Sharma and Rahul Dravid
‘मी कोणत्याच विश्वचषकात पहिल्या पसंतीचा खेळाडू नव्हतो…’, मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, मला संघातून…
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
BCCI Announces Ajay Ratra as Replacement of Salil Ankola as member of India selection committee
बांगलादेशविरूद्धच्या मालिकेपूर्वी BCCIकडून मोठे फेरबदल, निवड समितीविषयी घेतला महत्त्वाचा निर्णय
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह

हेही वाचा >>>‘मी कोणत्याच विश्वचषकात पहिल्या पसंतीचा खेळाडू नव्हतो…’, मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, मला संघातून…

वरळीच्या आदर्श नगर येथील रहिवासी असलेले हडप मुंबईच्या मैदानात वर्षभर स्पर्धांचे पद्धतशीर आयोजन करण्यासाठी ओळखले जातात. ‘‘हडप यांनी गेली २५ वर्षे मैदान क्रिकेटमध्ये काम पाहिले आहे. मी लहान असताना अजित नाईक १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत खेळलो आहे. ही स्पर्धा सुरू करणाऱ्यांपैकी ते एक होते. आजही ते या स्पर्धेच्या आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवतात. गेल्या हंगामात ‘एमसीए’ स्पर्धांच्या आयोजनातही त्यांची भूमिका महत्त्वाची होती,’’ असे ‘एमसीए’ अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले.

नामांकितांकडून मतदान

दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, महिला संघाच्या माजी कर्णधार डायन एडल्जी यासह भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर, जतीन परांजपे, करसन घावरी, समीर दिघे, सलील अंकोला आणि मुंबईचे माजी कर्णधार मिलिंद रेगे, धवल कुलकर्णी यांनी मतदान केले. रामदास आठवले, प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले यांनीही आपला मतदानाचा अधिकार बजावला.