Abhimanyu Mithun big no ball controversy in t10 league : भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुन अचानक चर्चेत आला आहे. अभिमन्यू सध्या अबुधाबी येथे सुरु असलेल्या टी-१० लीगमध्ये खेळत आहे. नॉर्दर्न वॉरियर्सकडून खेळणाऱ्या अभिमन्यू मिथुनने चेन्नई ब्रेव्हजविरुद्ध जोरदार गोलंदाजी केली. त्याने दोन षटकात केवळ ११ धावा देत दोन विकेट घेतल्या. मात्र, या सामन्यात मिथुनने असा नो बॉल टाकला, जो लोकांना पचवता येणार नाही. लोक भारतीय वेगवान गोलंदाजावर मॅच फिक्सिंगचा आरोप करत आहेत. ३४ वर्षीय मिथुनने सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली आहे.
अभिमन्यूच्या नो बॉलची इतकी चर्चा होण्याचे कारण म्हणजे तो खूप मोठा नो बॉल आहे. त्याचा पाय क्रीझ लाइनच्या जवळपास दीड फूट पुढे गेला आहे. अनेकदा गोलंदाजांनाकडून नो बॉल टाकला जातो. यासाठी ते सतत सराव करतात, जेनेकरुन गोलंदाजी करताना त्याचा पाय निर्धारित क्रीझ लाइनच्या बाहेर जाऊ नये. कारण इकडे-तिकडे एक इंचही विचलनामुळे संघाचे मोठे नुकसान होते, परंतु अभिमन्यूने टाकलेला नो बॉल रेषेपासून कित्येक मीटर दूर गेला, असे म्हणता येईल.
क्रिकेट सामन्यात असे नो बॉल पचवणे फार कठीण जाते. याच कारणामुळे अभिमन्यू अचानक चर्चेत आला. आहेत. मात्र, त्या नो बॉलशिवाय अभिमन्यूची गोलंदाजीही शानदार होती, पण तरीही त्याच्या संघाला सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मिथुनचा हा पराक्रम पाहून लोकांना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरची आठवण झाली, ज्याने २०१० मध्ये इंग्लंड दौऱ्यात स्पॉट फिक्सिंग अंतर्गत नो-बॉल टाकला होता. त्या कसोटी सामन्यात आमिरने (मोहम्मद अमीर) टाकलेला नो बॉल आजपर्यंत लोक विसरू शकले नाहीत. सोशल मीडियावर लोक मिथुनवर नो फिक्सिंगचे आरोप करत आहेत.
हेही वाचा – IPL 2024: ‘बच्चे, इजी हो जा…’, नवीनशी झालेल्या भांडणानंतर ‘या’ पाकिस्तानी खेळाडूने विराटला केला होता मेसेज
५व्या षटकात अभिमन्यू मिथुनने टाकला नो बॉल –
चेन्नई ब्रेव्हजच्या डावातील पाचव्या षटकात ही घटना घडली. अभिमन्यू मिथुनने या षटकातील तिसरा चेंडू टाकताना त्याचा डावा पाय सुमारे दीड फूट रेषेच्या बाहेर काढला. अशा परिस्थितीत आता त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिथुनने २०१०-११ मध्ये भारतासाठी ४ कसोटी आणि ५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
चेन्नईने नॉर्दर्न वॉरियर्सचा ५ गडी राखून पराभव केला –
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, चरित असलंकाच्या नेतृत्वाखालील चेन्नई ब्रेव्ह्स संघाने अँजेलो मॅथ्यूजच्या नेतृत्वाखालील नॉर्दर्न वॉरियर्स संघाचा ५ गडी राखून पराभव केला. ब्रेव्हजसाठी सिकंदर रझाने १० चेंडूत २७ धावा केल्या, तर नॉर्दर्न गोलंदाजांनी २१ अतिरिक्त धावा दिल्या. प्रथम फलंदाजी करताना वॉरियर्सने सलामीवीर हजरतुल्ला जझाईच्या ५४ धावांच्या जोरावर ३ गडी गमावून १०६ धावा केल्या. ब्रेव्हजकडून मोहम्मद नबीने २ विकेट्स घेतल्या.