Abhinav Bindra awarded Olympic order: अभिनव बिंद्राची गणना भारतातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. भारतासाठी नेमबाजीत ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा तो एकमेव भारतीय आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राला ऑलिम्पिकमधील उत्कृष्ट सेवेसाठी ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केली.

ऑलिम्पिकच्या समारोपाच्या एक दिवस आधी १० ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये १४२व्या IOC सत्रादरम्यान हा पुरस्कार सोहळा होणार आहे. IOC अध्यक्षांनी २० जुलै रोजी बिंद्रा यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात लिहिले होते की, ‘तुम्हाला कळवताना मला अतिशय आनंद होत आहे की IOC कार्यकारी मंडळाने ऑलिम्पिकमधील तुमच्या प्रशंसनीय सेवांसाठी तुम्हाला ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

हेही वाचा – Olympic 2024: हॉटस्टार, फॅनकोड नाही तर… भारतात ‘या’ अ‍ॅपवर फ्री पाहता येणार ऑलिम्पिकचे लाईव्ह सामने, जाणून घ्या सविस्तर

ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार म्हणजे काय?

‘ऑलिम्पिक ऑर्डर’ हा IOC चा सर्वोच्च पुरस्कार आहे, जो ऑलिम्पिक खेळातील विशिष्ट योगदानासाठी दिला जातो. सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा तीन प्रकारात हा पुरस्कार दिला जातो. नामांकने ऑलिम्पिक ऑर्डर समितीद्वारे प्रस्तावित केली जातात आणि कार्यकारी मंडळाद्वारे निर्णय घेतला जातो. हा पुरस्कार १९७५ मध्ये सुरू झाला. १९७५ पासून आतापर्यंत ११६ जणांना हा पुरस्कार मिळाला आहे. अभिनव बिंद्रा यांच्याआधी १९८३ मध्ये इंदिरा गांधी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

हेही वाचा – Paris 2024 Olympics Schedule: भारताचं संपूर्ण वेळापत्रक, तारीख वेळेसहित कधी होणार हॉकी आणि बॅडमिंटनसहित सर्व खेळांचे सामने?

भारताचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी अभिनव बिंद्राचे ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ पुरस्काराने सन्मानित होण्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी ‘एक्स’ वर लिहिले की, ‘ऑलिम्पिक खेळातील अतुलनीय योगदानाबद्दल अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांच्या या कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटतो आणि ते खऱ्या अर्थाने या पुरस्कारासाठी पात्र आहेत. त्यांनी नेमबाज आणि ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या पुढील पिढ्यांना प्रेरणा दिली आहे.

४१ वर्षीय अभिनव बिंद्राने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारे ते भारताचे पहिले खेळाडू आहेत. बिंद्रा २०१० ते २०२० पर्यंत आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशनच्या अ‍ॅथलिट समितीचे सदस्य होते, तर २०१४ पासून ते अध्यक्ष आहेत. २०१८ पासून ते IOC अ‍ॅथलिट्स कमिशनचे सदस्य आहेत.