Abhinav Bindra awarded Olympic order: अभिनव बिंद्राची गणना भारतातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. भारतासाठी नेमबाजीत ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा तो एकमेव भारतीय आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राला ऑलिम्पिकमधील उत्कृष्ट सेवेसाठी ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केली.
ऑलिम्पिकच्या समारोपाच्या एक दिवस आधी १० ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये १४२व्या IOC सत्रादरम्यान हा पुरस्कार सोहळा होणार आहे. IOC अध्यक्षांनी २० जुलै रोजी बिंद्रा यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात लिहिले होते की, ‘तुम्हाला कळवताना मला अतिशय आनंद होत आहे की IOC कार्यकारी मंडळाने ऑलिम्पिकमधील तुमच्या प्रशंसनीय सेवांसाठी तुम्हाला ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ देण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार म्हणजे काय?
‘ऑलिम्पिक ऑर्डर’ हा IOC चा सर्वोच्च पुरस्कार आहे, जो ऑलिम्पिक खेळातील विशिष्ट योगदानासाठी दिला जातो. सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा तीन प्रकारात हा पुरस्कार दिला जातो. नामांकने ऑलिम्पिक ऑर्डर समितीद्वारे प्रस्तावित केली जातात आणि कार्यकारी मंडळाद्वारे निर्णय घेतला जातो. हा पुरस्कार १९७५ मध्ये सुरू झाला. १९७५ पासून आतापर्यंत ११६ जणांना हा पुरस्कार मिळाला आहे. अभिनव बिंद्रा यांच्याआधी १९८३ मध्ये इंदिरा गांधी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
भारताचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी अभिनव बिंद्राचे ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ पुरस्काराने सन्मानित होण्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी ‘एक्स’ वर लिहिले की, ‘ऑलिम्पिक खेळातील अतुलनीय योगदानाबद्दल अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांच्या या कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटतो आणि ते खऱ्या अर्थाने या पुरस्कारासाठी पात्र आहेत. त्यांनी नेमबाज आणि ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या पुढील पिढ्यांना प्रेरणा दिली आहे.
४१ वर्षीय अभिनव बिंद्राने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारे ते भारताचे पहिले खेळाडू आहेत. बिंद्रा २०१० ते २०२० पर्यंत आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशनच्या अॅथलिट समितीचे सदस्य होते, तर २०१४ पासून ते अध्यक्ष आहेत. २०१८ पासून ते IOC अॅथलिट्स कमिशनचे सदस्य आहेत.