गेल्या महिन्याभरापासून ऑलिम्पिक आणि त्यातील भारतीय खेळाडूंची कामगीरी या दोन विषयांवरून ट्विटरवर ट्विटरवॉर सुरु आहे. ऑलिम्पिक संपली असली तरी सोशल मीडियावर सुरु असलेले ट्विटरवॉर काही संपण्याचे नाव घेत नाही. कोणीही उठून भारतीय खेळांडूवर टिका करत आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या बचावासासाठी अनेकांनी दोन हात केले. काहींनी खेळाडूंच्या वाईट कामगीरीबद्दल ट्विटरवर कडव्या भाषेत त्यांचा समाचार घेतला, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल देखील यातून सुटली नाही.
आता भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा याला देखील ट्विटरवर एकाने डिवचण्याचा प्रयत्न केला. ‘ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत चौथ्या स्थानावर आलेल्या अभिनव बिंद्रा याचे स्वागत केले जात नाही पण जिमनॅस्टीकमध्ये चौथे स्थान पटकवणा-या दिपाला मात्र खेलरत्नने सन्मानित केले जाते’ असे म्हणत एकाने अभिनवच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय सोशल मीडियावर चर्चेत आला. पण अभिनव जितका नेमबाजीत हुशार तितकाच तो टीकाकारांवर निशाणा साधण्यात हुशार आहे. ‘गेल्या ऑलिम्पिकमध्ये आपण सूवर्ण पदकाची कमाई केल्यानंतर माझे पुरेपूर कौतुक देशाने केले आहे. मला देशाने खूप मानसन्मान दिला आता तो सन्मान मिळवण्याची वेळ दिपाची आहे आणि मला यात काहीच वाईट वाटत नाही’ अशा शब्दात त्याच्यावर टीका करणा-यांचे तोंड अभिनवने बंद केले आहे.

Story img Loader