Abhinav Mukund criticizes BCCI’s team selection: बीसीसीआयने शुक्रवारी संघाची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. त्याचबरोबर टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा होणे बाकी आहे. अशात आता बीसीसीआयच्या संघ निवडीवर आजी माजी खेळाडून प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

आता या दौऱ्यासाठी निवडलेला संघ भारतीय खेळाडू अभिनव मुकुंदला आवडला नाही. ट्विट करून त्याने केवळ निवडीवरच प्रश्न उपस्थित केला नाही, तर आयपीएलबद्दलही बरेच काही सांगितले.या दौऱ्यात यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना कसोटी संघात संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव, चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन

मुकुंदने तामिळनाडूसाठी १४५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर १०२५८ धावा आहेत. त्याचबरोबर त्याने टीम इंडियासाठी सात कसोटी सामनेही खेळले आहेत. मुकुंदचे मत आहे की, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ज्या पद्धतीने टीम इंडियाच्या संघाची निवड झाली आहे, ती त्याच्या समजण्यापलीकडची आहे. अशा निवडीमुळे खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची इच्छा उरणार नाही.

हेही वाचा – Asian Games 2023: बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय; ‘या’ स्पर्धांमुळे एकाचवेळी टीम इंडियाचे दोन संघ उतरणार मैदानात

अभिनव मुकुंद ट्विटमध्ये काय म्हणाला –

अभिनव मुकुंदने ट्विटमध्ये लिहिले की, “मला ही निवड समजू शकली नाही. माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत, पण सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे देशांतर्गत क्रिकेट खेळून तरुण खेळाडूचा काय उपयोग? टीम इंडियापर्यंत पोहोचण्याचा फ्रँचायझी क्रिकेट हा सोपा मार्ग असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.” या ट्विटला यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यावर निशाणा म्हणून पाहिले जात आहे.

हेही वाचा – IND vs WI: टीम इंडियातून वगळल्यानंतर चेतेश्वर पुजाराचा मोठा निर्णय! आता ‘या’ संघाकडून खेळताना दिसणार

यशस्वी जैस्वालसाठी आयपीएलचा १६वा हंगाम राहिला खास –

यशस्वी जैस्वालने आतापर्यंत केवळ १५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. तर गायकवाडने २७ सामन्यांमध्ये सहभाग घेतला आहे. हे दोन्ही खेळाडू आयपीएल २०२३ मध्ये खूप यशस्वी ठरले होते. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना यशस्वी जैस्वालनेही शतक झळकावले. त्याचवेळी गायकवाडने चेन्नई सुपर किंग्जसाठी अनेक झंझावाती खेळीही खेळल्या. या खेळाडूंची निवड देशांतर्गत क्रिकेटच्या धर्तीवर नसून आयपीएलच्या धर्तीवर करण्यात आली आहे, असे अभिनव मुकुंदचे मत आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी करणाऱ्या खेळाडूंकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Story img Loader