वानखेडे स्टेडियमवरील रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईचा धावांचा ‘अभिषेक’ दुसऱ्या दिवशीही अविरत सुरू होता. वसिम जाफर आणि सचिन तेंडुलकर यांच्यापाठोपाठ अभिषेक नायरनेही क्रिकेटरसिकांना शतकाची मेजवानी पेश केली. त्यामुळेच दुसऱ्या दिवसअखेर मुंबईने ६ बाद ५२४ धावांचा डोंगर उभारला.
सकाळच्या सत्रात जाफरने नाइट वॉचमन धवल कुलकर्णीच्या साथीने अर्धा तास खेळून काढला. पण गगनदीप सिंगने जाफरचा (१५०) त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या अभिषेकने दणक्यात आपले खाते उघडले आणि चालू रणजी हंगामातील तिसरे शतक झळकावत मुंबईचा धावांचा आलेख उंचावण्यात सिंहाचा वाटा उचलला. अभिषेकने ३४३ मिनिटे आणि २१७ चेंडूंचा सामना करीत १२ चौकारांच्या सहाय्याने नाबाद १२२ धावांची आपली शानदार खेळी साकारली.
अभिषेकने धवलसोबत पाचव्या विकेटसाठी ७०, आदित्य तरेसोबत सहाव्या विकेटसाठी १२३ आणि अंकित चव्हाणसोबत सातव्या विकेटसाठी ४५ धावांची नाबाद भागीदारी केली. या तीन महत्त्वाच्या भागीदाऱ्या मुंबईसाठी महत्त्वाच्या ठरल्या. आदित्य तरेने ६४ धावांची अर्धशतकी खेळी उभारली. अभिमन्यू चव्हाणच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक पिनल शाहकडे तो झेल देऊन माघारी परतला. बडोद्याचा कर्णधार युसूफ पठाणने दुसऱ्या दिवशीही पहिल्या स्लिपमध्ये झेल सोडण्याची परंपरा जपली. सोमवारी धवल कुलकर्णीला त्याने जीवदान दिले. पण त्यानंतर धवल २७ धावांवर तंबूत परतला. मुर्तूजा वहोराने ८९ धावांत ३ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : १८० षटकांत ६ बाद ५२४ (वसिम जाफर १५०, सचिन तेंडुलकर १०८, अभिषेक नायर खेळत आहे १२२, आदित्य तरे ६४; मुर्तूजा वहोरा ३/८९)
मुंबईचा धावांचा ‘अभिषेक’!
वानखेडे स्टेडियमवरील रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईचा धावांचा ‘अभिषेक’ दुसऱ्या दिवशीही अविरत सुरू होता. वसिम जाफर आणि सचिन तेंडुलकर यांच्यापाठोपाठ अभिषेक नायरनेही क्रिकेटरसिकांना शतकाची मेजवानी पेश केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-01-2013 at 02:50 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek nayar hits unbeaten ton as mumbai post