IND vs ENG Abhishek Sharma 2nd Fastest Century for India: शर्माजी का बेटा… अभिषेक शर्माने १० षटकार आणि ५ चौकारांसह वानखेडेच्या मैदानावर ऐतिहासिक शतक झळकावले आहे. इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यादरम्यान अभिषेक शर्माने ही वादळी फलंदाजी करत संघाला एक जबरदस्त सुरूवात करून दिली. अभिषेक शर्माच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पॉवरप्लेमध्ये ९५ धावांचा टप्पा गाठला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युवराज सिंहच्या हाताखाली क्रिकेटचे धडे गिरवलेल्या अभिषेक शर्माने वादळी खेळी करत इंग्लंडची झोप उडवली. इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या ३७ चेंडूत आश्चर्यकारक शतक झळकावले. अभिषेकने १० षटकार लगावत इंग्लंडविरुद्ध टी-२० सर्वात वेगवान शतकाचा विक्रम केला. अभिषेकने अवघ्या ११व्या षटकात आपले शतक पूर्ण केले.

रोहित शर्मानंतर सर्वात जलद शतक झळकावणारा अभिषेक शर्मा भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माने ३५ चेंडूत सर्वात जलद शतक झळकावले होते. त्याच्यानंतर आता अभिषेक शर्माने ३७ चेंडूत शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे.

T20I मध्ये सर्वात जलद शतकं झळकावणारे पूर्ण सदस्य संघाचे खेळाडू (चेंडूनुसार)

३५ चेंडू डेव्हिड मिलर विरुद्ध बांगलादेश पॉचेफस्ट्रूम २०१७
३५ चेंडू रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका इंदूर २०१७
३७ चेंडू अभिषेक शर्मा विरुद्ध इंग्लंड वानखेडे २०२५
३९ चेंडू जॉन्सन चार्ल्स वि दक्षिण आफ्रिका सेंच्युरियन २०२३

सर्वात जलद अर्धशतक करणारा दुसरा खेळाडू

भारताने पहिली विकेट गमावल्यानंतर सलामीवीर अभिषेक शर्माने झंझावाती फलंदाजी सुरू ठेवली आणि ५व्या षटकात षटकार खेचून आपले अर्धशतक पूर्ण केले. अभिषेकने अवघ्या १७ चेंडूत अर्धशतक झळकावले. अशाप्रकारे, युवा सलामीवीर फलंदाज युवराज सिंग नंतर भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठरला. युवराजने २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध डरबनमध्ये अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.