ICC T20 Rankings Abhishek Sharma takes a big jump in batting rankings : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अभिषेक शर्माची बॅट जबरदस्त तळपली होती. त्याने १३५ धावांची ऐतिहासिक खेळी साकारत विक्रमांची रांग लावली होती. आता या खेळीच्या जोरावर अभिषेक शर्माला आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत त्याने मोठी झेप घेतली आहे. तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला नसला तरी तो अव्वल स्थानाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे ट्रॅव्हिस हेडची चिंता वाढली आहे.

अभिषेक शर्माची टी-२० क्रमवारीत हवा –

आयसीसीने यावेळी जाहीर केलेल्या नवीन टी-२० क्रमवारीत अभिषेक शर्माने मोठी झेप घेतली आहे. यावेळी तो ३८ स्थानांची झेप घेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अभिषेक शर्माचे हे सर्वकालीन उच्च क्रमवारी आहे. वास्तविक, त्याने प्रथमच टॉप १० मध्ये प्रवेश केला आहे. यासह तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. परंतु, पहिल्या क्रमांकावर अजूनही ट्रॅव्हिस हेडच आहे. सध्या हेडचे रेटिंग पॉइंट ८५५ आहेत. अभिषेक शर्माबद्दल बोलायचे, तर तो ८२९ रेटिंगसह नंबर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा प्रकारे अभिषेकला ३८ स्थानांचता फायदा झाल्याने सर्व फलंदाजांना त्यांच्या स्थानावरून एका जागेवरून खाली यावे लागले आहे.

तिलक वर्मासह सूर्या-सॉल्टलाही बसला फटका –

आयसीसी टी-२० क्रमवारीत सध्या भारताचा तिलक वर्मा एका स्थानाच्या घसरणीसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग पॉइंट ८०३ आहेत. इंग्लंडच्या फिल सॉल्टबद्दल बोलायचे, तर त्याला एक स्थान गमवावे लागले आहे, तो आता ७९८ च्या रेटिंग पॉइंटसह चौथ्या क्रमांकावर गेला आहे. भारताच्या सूर्यकुमार यादवलाही एक स्थानाचा फटका बसला आहे. आता तो ७३८ रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे.

या फलंदाजांचेही झाले नुकसान –

या टॉप ५ फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडच्या जोस बटलरलाही एका स्थानाचा फटका बसला आहे. तो सध्या ७२९ रेटिंग पॉइंटसह सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम एका स्थानाने घसरून सातव्या क्रमांकावर आला आहे. त्याचे रेटिंग पॉइंट ७१२ आहेत. श्रीलंकेचा पथुम निसांका ७०७ रेटिंग पॉइंटसह आठव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान ७०४ रेटिंग पॉइंटसह नवव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेच्या कुसल परेराला मात्र आपले दहावे स्थान वाचवण्यात यश आले आहे. त्याचे रेटिंग पॉइंट सध्या ६७५ आहेत.

Story img Loader