Abhishek Sharma Fastest T20I Century: विस्फोटक फलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिषेक शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. त्याने वेगवान शतकाच्या भारतीय विक्रमाची बरोबरी केली आहे. डावखुऱ्या सलामीवीराने सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीमध्ये मेघालयविरुद्ध सामन्यात ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पंजाबकडून खेळताना अभिषेकने अवघ्या २८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अशाप्रकारे त्याने गुजरातचा फलंदाज उर्विल पटेलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. T20 मधील सर्वात जलद शतकाचा विक्रम २७ चेंडूंचा आहे, एका चेंडूच्या फरकाने अभिषेक शर्मा हा विक्रम मोडण्यासाठी हुकला.

गुजरातचा यष्टिरक्षक फलंदाज उर्विल पटेलने २७ नोव्हेंबर रोजी सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात २८ चेंडूत शतक झळकावून नवा भारतीय विक्रम रचला होता. त्यानंतर त्याने ऋषभ पंतचा ३२ चेंडूत झळकावलेल्या टी-२० शतकाचा विक्रम मोडीत काढला. आता अभिषेक शर्मानेही पंतच्या पुढे जाऊन उर्विल पटेलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. अभिषेक शर्माचे टी-२० मधील हे सहावे शतक आहे.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Steve Smith Smashes 34th Test Century and 11th Hundred Against India Most By any Batter IND vs AUS
IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
Dabur Vs Patanjali
Dabur Vs Patanjali : च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून डाबर आणि पतंजली भिडले! बाबा रामदेव यांच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम

हेही वाचा – IND vs AUS: अ‍ॅडलेड कसोटीत सलामीला कोण उतरणार? रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, “मी कुठेतरी… “

हेही वाचा – Highest T20 Score: २० षटकांत ३४९ धावा! बडोद्याच्या संघाने रचला नवा विश्वविक्रम, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रचला इतिहास

मेघालयने २० षटकांत १४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने २९ चेंडूत १०६ धावांची नाबाद खेळी केली. ३६५.५२ च्या स्ट्राईक रेटसह, अभिषेक शर्माने आपल्या डावात ११ षटकार आणि ८ चौकार लगावले. या खेळीदरम्यान अभिषेकने २८व्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. अभिषेक शर्माच्या झंझावाती शतकाच्या बळावर पंजाब संघाने मेघालयविरुद्धचा सामना १० षटकांत ७ गडी राखून जिंकला. पंजाबने ९.३ षटकांत ३ गडी गमावून १४४ धावा केल्या होत्या.

सर्वात जलद टी-२० शतक झळकावणारे फलंदाज

२७ चेंडू – साहिल चौहान – एस्टोनिया विरुद्ध सायप्रस, २०२४
२८ चेंडू – उर्विल पटेल – गुजरात विरुद्ध त्रिपुरा, २०२४
२८ चेंडू – अभिषेक शर्मा – पंजाब विरुद्ध मेघालय, २०२४
३० चेंडू – ख्रिस गेल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पुणे वॉरियर्स, २०१३
३२ चेंडू – ऋषभ पंत – दिल्ली वि हिमाचल प्रदेश २०१८

Story img Loader