यंदाच्या स्थानिक हंगामात धावांचा पाऊस पाडणारा मुंबईचा अभिषेक नायर आयपीएलच्या लिलावात सर्वाधिक भाव मिळालेला भारतीय क्रिकेटपटू ठरला. १ लाख अमेरिकन डॉलर्स या आधारभूत किमतीनिशी झेपावणाऱ्या अष्टपैलू अभिषेक नायरला पुणे वॉरियर्सने ६ लाख ७५ हजार अमेरिकन डॉलर्सला खरेदी केले. तसेच वेगवान गोलंदाज आर. पी. सिंग (४ लाख अमेरिकन डॉलर्स) आणि जयदेव उनाडकट (५ लाख २५ हजार अमेरिकन डॉलर्स) यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने खरेदी केले.
१ लाख रुपये आधारभूत किमतीनिशी लिलावात असलेल्या आर. पी. सिंगची सध्याची कामगिरी लक्ष्यवेधक मुळीच नव्हती, परंतु तरीही बंगळुरूने त्याला संघात घेण्यात धन्यता मानली. भारताचे प्रतिनिधित्व अद्याप न करू शकलेल्या जयदेव उनाडकट आणि पंकज सिंग (बंगळुरू, १ लाख ५० हजार अमेरिकन डॉलर्स) या स्थानिक क्रिकेटमधील ताऱ्यांनाही नशिबाने चांगलीच साथ दिली आहे. या दोघांसाठी १ लाख अमेरिकन डॉलर्स इतकी आधारभूत किंमत ठरविण्यात आली होती.
भारताचा वेगवान गोलंदाज मनप्रीत गोनीलासुद्धा चांगला भाव मिळाला. किंग्ज इलेव्हन पंजाबने गोनीसाठी ५ लाख अमेरिकन डॉलर्स मोजले. हैदराबाद सनराजयर्सने युवा वेगवान गोलंदाज सुदीप त्यागीला १ लाख अमेरिकन डॉलर्स या आधारभूत किमतीलाच खरेदी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा