Gautam Gambhir Says Absolutely pathetic what happened in Delhi today: सोमवारी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ सामन्यात बराच गोंधळ झाला. या सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज ‘टाईम आऊट’ झाल्याने वाद निर्माण झाला आहे. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनवर खिलाडूवृत्ती न दाखवल्याने त्याच्यावर टीका होत असतानाच अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनीही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

२५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर ही घटना घडली. यानंतर शाकिब अल हसनने मैदानात आलेल्या फलंदाज अँजेलो मॅथ्यूजविरुद्ध ‘टाईम आऊट’ची अपील केली. वास्तविक, मॅथ्यूजने सुरुवातीला खराब हेल्मेट आणले होते, ज्यामुळे त्याने हेल्मेट बदलताना चेंडूचा सामना करण्यासाठी विलंब केला. यावर शाकिब अल हसनने टाईम आऊटची अपील केली. यानंतर मैदानावरील पंच माराईस इरास्मस यांनी शाकिबला वारंवार विचारले, तू खरोखरच अपील करत आहेस का? बांगलादेशचा कर्णधार म्हणाला, होय आम्ही अपील करत आहोत. यानंतर इरास्मसने मॅथ्यूजला बाद घोषित केले.

गौतम गंभीरने अँजेलो मॅथ्यूजला आउट देण्याच्या निर्णयाचे निराशाजनक वर्णन केले आहे, तर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजानेही प्रश्न उपस्थित केले आहेत. गौतम गंभीरने ट्विटरवर लिहिले की, “दिल्लीत जे काही घडले ते खूपच निराशाजनक आहे.”

हेही वाचा – IND vs SA: १६ वर्षांपूर्वी सौरव गांगुलीबरोबरही असेच घडले होते, सहा मिनिटे उशिरा येऊनही दादा कसा ‘Time Out’ झाला नव्हता?

ऑस्ट्रेलिया फलंदाज उस्मान ख्वाजाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अँजेलो मॅथ्यूज क्रीजवर पोहोचला होता, त्यानंतर त्याचे हेल्मेट तुटले. अशा स्थितीत तो ‘टाईम आऊट’ कसा होऊ शकतो? जर तो क्रीजवर आला नसता, तर मी पूर्णपणे टाईम आऊटच्या बाजूने असतो, पण हे हास्यास्पद आहे. एका फलंदाजाला क्रीजवर पोहोचण्यासाठी तीन मिनिटे लागतात त्यापेक्षा हे वेगळे नाही.”

शाकिबने दाखवली नाही खिलाडूवृत्ती –

सामन्यादरम्यान अँजेलो मॅथ्यूज विरोधी संघाचा कर्णधार शाकिब अल हसनशी बोलताना दिसला, पण शाकिबने अपील मागे न घेता अजिबात दया दाखवली नाही. त्यानंतर मैदानावरील पंचांशी बोलूण घेण्सास सांगितले. यानंतर अँजेलो मॅथ्यूज पंचांशीही चर्चा केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि त्याला तंबूत परतावे लागले.

Story img Loader