ACA Initiates Inquiry Against Hanuma Vihari : रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात आंध्र संघाचे कर्णधारपद सोडण्याबाबत धक्कादायक खुलासा करणाऱ्या हनुमा विहारीशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. आंध्र क्रिकेट असोसिएशनने त्याच्याविरोधात चौकशी सुरू करण्याची घोषणा केली आहे. एक प्रेस रीलिझ जारी करून, क्रिकेट असोसिएशनने लिहिले की, राज्य संघटनेने हनुमा विहारी विरुद्ध चौकशी सुरू केली आहे, ज्याने चालू हंगामाच्या सुरुवातीला कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा आंध्र क्रिकेट असोसिएशनवर आरोप केला होता.
आंध्र क्रिकेट असोसिएशन सर्व तक्रारींची सखोल चौकशी करणार –
आंध्र क्रिकेट असोसिएशनने एक प्रेस रिलीज जारी केले आहे, जे हनुमा विहारी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देखील शेअर केले आहे. हे शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘प्रयत्न करत राहा.’ प्रेस रिलीजमध्ये असे लिहिले आहे की, ‘विहारीकडून अपमानास्पद वागणूक आणि असभ्य भाषा वापरल्याबद्दल टीममेट, सपोर्ट स्टाफ आणि एसीए प्रशासकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आंध्र क्रिकेट असोसिएशन सर्व तक्रारींची सखोल चौकशी करेल आणि योग्य ती कारवाई केली जाईल.
कोणतीही चूक न नसताना मला कर्णधारपदाचा राजीनामा धावा लागला –
सोशल मीडियावर पोस्ट करताना हनुमा विहारीने लिहिले होते, ‘रणजी ट्रॉफी २०२३-२४ मध्ये आम्ही शेवटपर्यंत कडवी झुंज दिली, पण नशिबी अपयश आले. आंध्र प्रदेशचा आणखी एका उपांत्यपूर्व फेरीच पराभव झाल्याने निराश आहे. ही पोस्ट अशा काही तथ्यांबद्दल आहे, जी मला आज तुमच्या पुढे मांडायची आहे. बंगालविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मी कर्णधार होतो, त्या सामन्यादरम्यान मी १७व्या खेळाडूला ओरडलो आणि त्याने त्याच्या वडिलांकडे (जो राजकीय नेता आहे) तक्रार केली. त्या बदल्यात त्याच्या वडिलांनी असोसिएशनला माझ्यावर कारवाई करण्यास सांगितले. गतवर्षी अंतिम फेरीतील बंगालविरुद्ध आम्ही ४१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला होता, कोणतीही चूक न नसताना मला कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले.’
हेही वाचा – Virat Kohli : ‘…तो आयपीएलही खेळणार नाही’, किंग कोहलीबद्दल सुनील गावसकरांचं मोठं वक्तव्य
असोसिएशनबद्दल काय म्हणाला विहारी?
विहारीने पोस्टमध्ये पुढे लिहिले होते की, ‘मी खेळाडूला वैयक्तिकरित्या कधीच काही बोललो नाही, पण असोसिएशनला असे वाटले की ज्या व्यक्तीने गेल्या वर्षी आपले शरीर पणाला लावले आणि डाव्या हाताने फलंदाजी केली, त्यापेक्षा तो खेळाडू अधिक महत्त्वाचा आहे. आंध्रला सात वर्षात पाचवेळा बाद फेरीत पोहोचवले आणि भारतासाठी १६ कसोटी खेळलो. मला लाज वाटत होती, पण मी या हंगामात खेळणे सुरू ठेवण्याचे एकमेव कारण म्हणजे मी खेळ आणि माझ्या संघाचा आदर करतो. खेदाची बाब म्हणजे असोसिएशनला वाटते, ते जे काही बोलतात ते खेळाडूंना ऐकावे लागते आणि खेळाडू त्यांच्यामुळेच तिथे आहेत.’
हेही वाचा – IND vs ENG 4th Test : “त्याने दबावात संयम दाखवला आणि…”, मालिका विजयानंतर रोहितकडून ध्रुव जुरेलचे कौतुक
आंध्रकडून न खेळण्याबाबत घेतला निर्णय –
हनुमा विहारी पुढे लिहिले, ‘मला अपमान आणि लाज वाटली पण मी आजपर्यंत व्यक्त झालो नाही. मी ठरवले आहे की मी आंध्रसाठी कधीही खेळणार नाही, जिथे माझा आदर कमी झाला आहे. होय, मला संघ आवडतो. प्रत्येक हंगामात आम्ही ज्या प्रकारे प्रगती करत आहोत ते मला आवडते, परंतु असोसिएशनला आमची प्रगती नको आहे.’