Virat Kohli Number One on Social Media: आयपीएल २०२३ मध्ये विराट कोहली खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता. या स्पर्धेतील १४ डावांमध्ये कोहलीने दोन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने आयपीएल २०२३ दरम्यान सोशल मीडियावर वर्चस्व गाजवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चाहत्यांनी स्पर्धेदरम्यान सोशल मीडियावर किंग कोहली सर्वाधिक उल्लेख (मेंशन) केलेला खेळाडू आहे.

आयपीएलच्या सोळाव्या हंगामामध्ये विराट कोहली सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेला खेळाडू होता. ‘इंटरएक्टिव्ह एव्हेन्यूज’ रिपोर्टनुसार, आयपीएल २०२३ मध्ये चाहत्यांनी सोशल मीडियावर सात दशलक्ष वेळा कोहलीला मेंशन केले आहे. हा क्रमांक आणि संख्या इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा जास्त आहे. म्हणजेच आयपीएल २०२३ मध्ये विराट कोहली बॅटसह सोशल मीडियावर मेंशन होण्याच्या बाबतीत सर्वात पुढे राहिला आहे.

Virat Kohli knows he is past his best and that will hurt David Lloyd statement after his poor test form
Virat Kohli : ‘विराट कोहलीचा काळ गेला…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘वयाबरोबर प्रत्येकजण…’
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Kapil Dev Statement on Rohit Sharma Virat Kohli Test Retirement Said They know when to call time
Kapil Dev On Rohit-Virat: “ते दोघं मोठे खेळाडू, त्यांना वाटेल तेव्हा…”, कपिल देव यांचं रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
Yuvraj Singh Father Yograj Singh Big Revelation He Wanted to Shoot Kapil dev and went House with pistol
युवराज सिंहचे वडील कपिल देव यांना मारण्यासाठी बंदूक घेऊन पोहोचले होते घरी, स्वत: केला खुलासा; काय आहे नेमकं प्रकरण?
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Who is Nikhil Kamath ?
Who is Nikhil Kamath : पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच्या पहिल्या पॉडकास्टमुळे चर्चेत आलेले निखिल कामथ कोण आहेत?

विराट कोहली पहिल्या सामन्यापासून सुपरफॉरमध्ये दिसला –

आयपीएल २०२३ मधील पहिल्या सामन्यापासून विराट कोहलीने आपला आक्रमक इरादा व्यक्त केला होता. मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात कोहलीने ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात बंगळुरूला १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. संघाने १६.२ षटकांतच सामना जिंकला होता. या सामन्यात कोहलीशिवाय कर्णधार फाफ डू प्लेसिसने ७३ धावा केल्या.

हेही वाचा – Domestic Cricket: रवी बिश्नोईचा मोठा निर्णय! राजस्थानऐवजी आता ‘या’ संघाकडून खेळताना दिसणार

त्याचबरोबर कोहलीने हंगामातील १४ डावांमध्ये ५३.२५ च्या सरासरीने आणि १३९.८२ च्या स्ट्राइक रेटने ६३९ धावा केल्या. यादरम्यान त्याने दोन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला. विशेष म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएलच्या सोळाव्या हंगामात लीग सामन्यांमधून बाहेर पडला होता.

विराट कोहलीची आतापर्यंतची आयपीएल कारकीर्द –

किंग कोहलीने त्याच्या आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत २३७ सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या २२९ डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने ३७.२५ च्या सरासरीने आणि १३०.०२ च्या स्ट्राइक रेटने ७२६३ धावा केल्या. यादरम्यान त्याने सात शतके आणि ५० अर्धशतके केली आहेत.

Story img Loader