Akash Chopra’s Reaction about T20 World Cup 2024 : सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली आहे. या दोऱ्यात भारतीय संघाला टी-२०, वनडे आणि कसोटी मालिका खेळायची आहे. यापैकी टी-२० मालिका १० डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र विराट कोहली आणि रोहित शर्मा कसोटी मालिकेतून टीम इंडियात पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर हे दोन दिग्गज जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकातही खेळताना दिसू शकतात. तत्पूर्वी माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने आगामी टी-२० विश्वचषकात रोहित शर्मासोबत सलामीचा जोडीदार कोण असेल याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
त्याने म्हटले की, यशस्वी जैस्वाल २०२४ च्या टी-२० विश्वचषकात रोहित शर्मासोबत सलामीला येऊ शकते. त्यामुळे ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल यांना सलामीला संधी मिळणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत ऋतुराज गायकवाड शानदार कामगिरी केली होती. गायकवाडने संपूर्ण मालिकेत सलामीला फलंदाजी करत काही चांगल्या इनिंगही खेळल्या. या कामगिरीच्या जोरावर, तो भारतासाठी द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला. याशिवाय यशस्वी जैस्वालबद्दल बोलायचे झाले तर, त्याने जवळपास प्रत्येक सामन्यात टीम इंडियाला शानदार सुरुवात दिली. जर आपण रोहित शर्माबद्दल बोलायचे, तर त्याने वनडे विश्वचषकानंतर एकही सामना खेळलेला नाही, पण तो आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळू शकतो.
रोहित-आकाश चोप्रासोबत यशस्वी ओपनिंग करणार –
आकाश चोप्राला त्याच्या यूट्यूबवर विचारण्यात आले की यशस्वी जैस्वाल आगामी टी-२० विश्वचषकात शुबमन गिलसोबत ओपनिंग करणार का? या प्रश्नाला आकाश चोप्राने उत्तर दिले. तो म्हणाला, “मला असे होईल वाटत नाही, कारण गिलबद्दल बोलायचे झाल्यास ऋतुराज गायकवाडचेही नाव घ्यावे लागेल. तो गिलप्रमाणे फलंदाजी करतो आणि मोठी इनिंग खेळू शकतो. यानंतर तुम्ही ऋतुराजला ठेवू शकता.”
हेही वाचा – Team India : रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहसह ‘या’ पाच भारतीय खेळाडूंचा आज वाढदिवस
माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “मला वाटतं की ऋतुराज गायकवाड किंवा शुबमन गिल नाही, पण यशस्वी एका टोकाला असेल तर रोहित शर्मा दुसऱ्या टोकाला खेळेल. रोहित शर्माने खेळण्यास नकार दिला असेल, असे मला वाटत नाही. राहुल द्रविडचा कार्यकाळ वाढवला असून रोहितही खेळू शकतो.”