Dinesh Karthik says KL Rahul contender for World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघाचा नियमित यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आता त्याच्या फिटनेसवर काम करत आहे, पण त्याला तंदुरुस्त होण्यासाठी किती वेळ लागेल हे स्पष्टपणे सांगता येत नाही. त्यामुळे तो एकदिवसीय विश्वचषकापूर्वी तंदुरुस्त होईल असे वाटत नाही. अशा परिस्थितीत भारतीय एकदिवसीय संघात विकेटकीपर-फलंदाजपदासाठी आघाडीचे तीन दावेदार केएल राहुल, इशान किशन आणि संजू सॅमसन आहेत. यापैकी कोणत्या खेळाडूला संधी मिळेल, याबाबत दिनेश कार्तिकने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केएल राहुल सध्या फिटनेसव काम करण्यासाठी एनसीएमध्ये आहे, तर इशान किशन आणि संजू सॅमसन टीम इंडियासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी संजू सॅमसनला वनडे संघात तर इशान किशनचा कसोटी आणि एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. आता एकदिवसीय विश्वचषक २०२३ बद्दल बोलत असताना, टीम इंडियाचा वरिष्ठ यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने सांगितले की २०२३ च्या विश्वचषकासाठी केएल राहुलचा टीम इंडियामध्ये समावेश होण्याची दाट शक्यता आहे.

दिनेश कार्तिकने चेन्नईतील एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, “या तिघांपैकी कोणाला संधी दिली जाईल हे सांगणे फार कठीण असले, तरी मला वाटते की या तिघांमध्ये केएल राहुल सर्वात पुढे आहे. कारण तो भारतीय संघाचा एक भाग राहिला आहे. आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. या प्रकरणात केएल राहुल पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर संजू सॅमसन आणि त्यानंतर इशान किशन आहे.

हेही वाचा – ENG vs AUS: रविचंद्रन अश्विनने ॲलेक्स कॅरीच्या कृतीचे केले समर्थन; म्हणाला, “खिलाडूवृत्ती यांसारख्या प्रश्नांऐवजी त्याच्या…”

दिनेश कार्तिक पुढे म्हणाला की, “मला वाटते की आपल्याकडे असे अनेक क्रिकेटपटू आहेत, जे संघाचा भाग बनून विशेष कामगिरी करू शकतात. आपण एक युनिट म्हणून कसे एकत्रित येतो आणि सर्वात मजबूत संघासोबत मैदानात उतरणे हे सर्वात मोठे आव्हान असेल.” आशिया चषक २०२३ आणि एकदिवसीय विश्वचषक जवळ आल्याने राहुल या दोन्ही स्पर्धांपूर्वी पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या शेवटच्या टप्प्यात राहुलच्या मांडीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to dinesh karthik kl rahul is a strong contender for team india for the world cup 2023 vbm