Ronaldo is the top-earning player on Insta: ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा एकदा आपल्या प्रतिस्पर्धकांना मागे टाकून सलग तिसऱ्या वर्षी इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा बनला. जुलैमध्ये सौदी अरेबियाला गेल्यानंतर २०१७ नंतर प्रथमच फोर्ब्सने जगातील सर्वाधिक कमाई करणारा ऍथलीट म्हणून स्थान मिळवलेला रोनाल्डो, आता २०२३ इंस्टाग्राम रिच लिस्टमध्ये अव्वल आहे, जो ऑनलाइन प्रभावाचा जागतिक मार्कर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्टाग्राम शेड्युलिंग टूल, हॉपर एचक्यू द्वारे संकलित केलेल्या २०२३ इन्स्टाग्राम रिच लिस्टनुसार, रोनाल्डो प्रति इन्स्टाग्राम पोस्टमधून ३.२३ अमेरिकन डॉलर कमावतो. ही मोठी रक्कम मिळण्याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर या दिग्गजाचे जवळपास ६०० दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत.यादीतील त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी, अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी, प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टसाठी सुमारे २.६ दशलक्ष कमावतो. यामुळे फुटबॉल दिग्गज रोनाल्डो आणि मेस्सी केवळ इतर सर्व क्रीडा व्यक्तिमत्त्वांपेक्षा पुढे आहेत. तसेच गायिका सेलेना गोमेझ, रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि उद्योजक काइली जेनर आणि अभिनेता ड्वेन ‘द रॉक’ जॉन्सन यांसारख्या ख्यातनाम सेलिब्रेंटींच्या देखील पुढे आहेत.

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार हे फक्त दोनच खेळाडू टॉप-२० मध्ये स्थान मिळवू शकले आहेत. नेमार त्याच्या पॅरिस सेंट-जर्मेन संघातील सहकारी किलियन एमबाप्पेच्या प्रत्येक पोस्टपेक्षा जवळजवळ दुप्पट रक्कम कमावतो. हॉपर मुख्यालयाचे सह-संस्थापक, माईक बंदर यांनी प्लॅटफॉर्मवरून दरवर्षी वाढणाऱ्या वार्षिक कमाईबद्दल आश्चर्य व्यक्त केले. तथापि, त्यांनी रोनाल्डो आणि मेस्सी सारख्या खेळाडूंच्या वर्चस्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की या खेळाडूंचा प्रभाव खेळपट्टीच्या पलीकडे डिजिटल क्षेत्रापर्यंत वाढत असून वैयक्तिक ब्रँडिंगची क्षमता प्रकट करते.

हेही वाचा – MS Dhoni: कारमधून जात असताना महेंद्रसिंग धोनीने चाहत्यांसोबत घेतला सेल्फी, VIDEO होतोय व्हायरल

हॉपर मुख्यालयाचे सह-संस्थापक माईक बंदर म्हणाले, “मला अजूनही नवल वाटत आहे की प्लॅटफॉर्मवर कमावलेले वार्षिक पैसे दरवर्षी वाढत आहेत. तरीही, मला अधिक आकर्षित करणारे ते खेळाडू आहेत, जे सातत्याने अव्वल स्थानावर आहेत. हे स्पष्ट आहे की पारंपारिक सेलिब्रिटींचे ग्लिट्ज आणि ग्लॅमर अजूनही नवीन ‘प्रभावक’ स्थितीवर वर्चस्व गाजवतात.”

माईक बंदर पुढे म्हणाले की, “रोनाल्डो आणि मेस्सी हे केवळ खेळपट्टीवरच नव्हे तर डिजिटल क्षेत्रावरही वर्चस्व गाजवतात. कारण हे स्पष्ट आहे की, ते वैयक्तिक ब्रँडिंगची शक्ती आणि त्यांचा परिणाम आपल्या ‘सामान्य’ लोकांवर करतात.” इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा टिकटॉक स्टार खाबी लाम या यादीत ४० व्या क्रमांकावर आहे. रोनाल्डो त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून लॅम जितके पैसे कमवतो त्याच्या १० पटीने कमावतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to forbes cristiano ronaldo is the highest paid player on insta for third year in a row vbm