Graeme Swann says Australia have shown a clear weakness against spin : विश्वचषकात टीम इंडियाची कामगिरी इतकी जबरदस्त राहिली आहे की, रोहित शर्माच्या संघात कोणत्याही क्रिकेट दिग्गजांना एकही दोष सापडलेला नाही. यामुळेच टीम इंडियाने या विश्वचषकातील सर्व सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघ आहे, ज्याने पहिले दोन सामने गमावल्यानंतर सलग आठ विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. मात्र, या ऑस्ट्रेलियन संघाने फिरकी गोलंदाजीविरुद्ध संघर्ष केला, ही त्यांची मोठी कमतरता आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाकडे मुख्य फिरकीपटू म्हणून फक्त अॅडम झाम्पा आहे. ही देखील त्याची एक कमतरता आहे, असे इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ग्रॅमी स्वानचे मत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी कमतरता झाली उघड –

ऑस्ट्रेलियाच्या उणिवांबद्दल बोलताना इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ग्रॅमी स्वान याने सीएनएन न्यूज 18 ला सांगितले की, “जेव्हा तुम्ही एखाद्या संघाकडून हरता, तेव्हा तुमच्या मनात भीती निर्माण होणे खूप साहजिक आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघात कोणतीही कमतरता राहिली नाही, परंतु फिरकीविरुद्ध ऑस्ट्रेलियाने स्पष्ट कमकुवतपणा दाखवला आहे.”

हेही वाचा – IND vs AUS Final : वर्ल्डकप फायनलमध्ये केटलबोरो असणार मैदानी पंच, भारतीयांच्या पोटात भीतीचा गोळा! कारण काय?

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू पुढे म्हणाला की, “दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियन संघ वर्चस्व दाखवू शकला नाही. अवघ्या २१२ धावांचा पाठलाग करतानाही त्यांना दक्षिण आफ्रिकेने जवळपास गुंडाळले होते. ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे, पण भारतीय संघ वेगळ्या शैलीत अंतिम फेरीत पोहोचला आहे.”

हेही वाचा – World Cup 2023: केवळ भारत-ऑस्ट्रेलियाच नाही, तर पाकिस्तान-नेदरलँडसह सर्व १० संघांना बक्षीस म्हणून मिळणार ‘इतकी’ रक्कम

रोहित शर्माने पकडला ऑस्ट्रेलियन संघाचा कमकुवतपणा –

या विश्वचषकात भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता. त्या सामन्यातही ऑस्ट्रेलियन संघाला फिरकीपटूंविरुद्ध धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. भारताने तो सामना जिंकला. त्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघाने अनुक्रमे अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध संघर्ष केला. कदाचित त्यामुळेच शुक्रवारी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फिरकीच्या स्लिप पोझिशनमध्ये उभा राहून झेल घेण्याचा सराव करत होता. याचा अर्थ स्पष्ट आहे की भारतीय फिरकीपटूही अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणण्याच्या तयारीत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to former england cricketer graeme swann australia have shown a clear weakness against spin vbm
Show comments