Former Player Deep Dasgupta Criticizes West Indies Batting: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सध्या डॉमिनिका येथे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले. यानंतर भारतीय संघाचे माजी खेळाडू दीप दासगुप्ताने वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजीवर प्रतिक्रिया दिली आहे.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो त्यांच्यासाठी अत्यंत चुकीचा ठरला. कारण यजमान संघ अवघ्या १५० धावांवर गारद झाला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सामन्याच्या पहिल्या दिवशी शानदार गोलंदाजी केली. अॅलिक अथानाज (४७) व्यतिरिक्त वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजा २० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत.
भारतीय क्रिकेट संघाकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक पाच बळी घेतले, तर रवींद्र जडेजाने तीन बळी घेतले, तर मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी एक विकेट घेतली. त्यानंतर टीम इंडियाने बॅटिंगमध्येही दमदार सुरुवात केली आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता ८० धावा केल्या. भारतीय संघ सध्या यजमान संघापेक्षा फक्त ७० धावांनी मागे आहे.
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दीप दासगुप्ताला निराश केले –
दरम्यान, भारताचे माजी यष्टिरक्षक-फलंदाज आणि समालोचक दीप दासगुप्ता म्हणाला की, डॉमिनिका कसोटीच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा कसा सामना करत आहेत, हे पाहून मला आश्चर्य वाटले. पहिल्या डावात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची शॉट सिलेक्शनही अत्यंत खराब असल्याचे त्याने सांगितले. माजी क्रिकेटपटू पुढे म्हणाला की, बॅटसह वेस्ट इंडिजची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती आणि अलिकडच्या वर्षांत सातत्य नसणे या त्यांच्या अडचणी आहेत.
वेस्ट इंडिजचा दृष्टिकोन निराशाजनक होता- दीप दासगुप्ता
दीप दासगुप्ता ईएसपीएनशी बोलताना म्हणाला, “वेस्ट इंडिजची फलंदाजी सामान्य होती, काहीही प्रभावी न केल्याबद्दल मला माफ केले जाईल. त्यांचा दृष्टीकोन पाहणे खूपच निराशाजनक होते. ते सर्व चांगले खेळाडू आहेत. कारण त्यांनी प्रथम धावा केल्या आहेत. पण सातत्याचा अभाव त्यांना त्रास देत आहे. त्यांनी अत्यंत खराब शॉट्स खेळले आणि भारतीय गोलंदाजांनी त्यांची शिकार केली.”