Gautam Gambhir Says Shreyas Iyer can be a game changer for India in the final: आयसीसी एकदिवसीय विश्वचषका २०२३चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या संपूर्ण विश्वचषकात भारताने चमकदार कामगिरी केली आहे आणि १० पैकी १० सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन संघाने विश्वचषकात खराब सुरुवात केली होती, परंतु उपांत्य फेरीच्या सामन्यापर्यंत त्यांनी आपला जुना फॉर्म दाखवण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीचा अंतिम सामना अपेक्षित आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटूने एक मोठं वक्तव्य केले आहे.

आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अपराजित राहून अंतिम फेरी गाठली आणि आता तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. भारताला वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी पाचवेळा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा लागेल. या विजयात रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, शुबमन गिल, मोहम्मद यांच्यासह इतर फलंदाज आणि गोलंदाजांचे मोठे योगदान होते. मात्र, आता गौतम गंभीरने श्रेयस अय्यर खरा गेम चेंजर असल्याचे म्हटले आहे.

Virat Kohli worst shot of his career against Mitchell Santner video viral
Virat Kohli : विराट कोहली फुलटॉसवर त्रिफळाचीत; चाहते अवाक, सोशल मीडियावर चर्चेला उधाण,VIDEO व्हायरल
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Rohit Sharma Gives Ultimatum to Kl Rahul Amid Trolling Ahead of IND vs NZ 2nd Test
IND vs NZ: “त्यांना माहितीय ते कारकिर्दीच्या…”, रोहित शर्माकडून सर्फराझचा उल्लेख करत ट्रोल होणाऱ्या केएल राहुलला अल्टीमेटम
Rohit Sharma Reveals Virat Kohli Took Responsibility of Batting At No 3 in IND vs NZ Bengaluru Test
IND vs NZ: “विराटला ही जबाबदारी…”, कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला का पाठवलं? रोहित शर्माने केला मोठा खुलासा
Rohit Sharma Statement on India All Out At 46 and Batting First Decision After Winning Toss In Press Conference IND vs NZ
Rohit Sharma: “माझ्यामुळे संघाची ही स्थिती…”, रोहित शर्माचे भारत ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मोठे वक्तव्य, नाणेफेकीच्या निर्णयाबद्दल पाहा काय म्हणाला?
IND vs NZ Virat Kohli No. 3 in Test Cricket
IND vs NZ : विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम; उंचपुऱ्या तरण्याबांड गोलंदाजाने दाखवला तंबूचा रस्ता
Sanju Samson honored by Congress Leader Shashi Tharoor in Thiruvananthapuram
IND vs BAN : शतकवीर संजू सॅमसनचे तिरुअनंतपुरममध्ये जंगी स्वागत, शशी थरुर यांनी पारंपारिक ‘पोनाडा’ शाल देऊन केला गौरव
IND vs BAN Suryakumar Yadav surpassing Rohit Sharma in fastest Indian player to score 2500 runs in T20
IND vs BAN : सूर्याने रोहित शर्माला मागे टाकत केला मोठा पराक्रम, ‘ही’ खास कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

श्रेयस अय्यर गेम चेंजर ठरू शकतो –

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने वर्ल्ड कप फायनलपूर्वी स्टार स्पोर्ट्स शोमध्ये आपले मत व्यक्त करताना श्रेयस अय्यरला गेम चेंजर म्हटले आहे. तो म्हणाला, “विराट कोहलीने विश्वचषका चांगली फलंदाजी केली आहे, पण माझ्यासाठी खरा गेम चेंजर श्रेयस अय्यर आहे. पहिला विश्वचषक खेळणाऱ्या या खेळाडूने शानदार फलंदाजी करताना सलग दोन शतके झळकावली आहेत. त्यामुळे अंतिम फेरीतही तो खरा गेम चेंजर ठरू शकतो.”

हेही वाचा – VIDEO: विराटच्या ५० शतकांच्या विक्रमावर कामरान अकमलचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “बाबर आझम मोडू शकतो, कारण तो…”

गौतम गंभीर पुढे म्हणाला, “श्रेयस अय्यरला या विश्वचषकाच्या सुरुवातीला दुखापत झाली होती, त्याला त्याच्या जागेसाठी झगडावे लागले. त्यानंतर बाद फेरीत ७० चेंडूत शतक झळकावणं हे अप्रतिम आहे. जेव्हा मॅक्सवेल आणि झाम्पा अंतिम फेरीत गोलंदाजी करायला येतली, तेव्हा तो भारतासाठी महत्त्वाचा ठरेल.”

हेही वाचा – IND vs AUS Final: “टीम इंडियाला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळेल, पण…”, अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधाराचं मोठं वक्तव्य

श्रेयस अय्यरने आतापर्यंत विश्वचषकात ५२६ धावा केल्या आहेत –

विशेष म्हणजे, विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्य बॅटमधून धावा आल्या नव्हत्या. तो शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता.पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. यानंतर पुढील तीन सामन्यांत तो फ्लॉप ठरला. पण श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात या २९ वर्षीय खेळाडूने आपला फॉर्म दाखवला. त्यानंतर सातत्याने धावा करत आहे. श्रेयस अय्यरने गेल्या दोन सामन्यांमध्ये सलग शतके झळकावली. या विश्वचषकात त्याने आतापर्यंत एकूण ५२६ धावा केल्या आहेत.