CSK has become most talked about team in IPL 2023: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १६व्या हंगामात विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावरही वर्चस्व गाजवले आहे. संपूर्ण हंगामात, चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा चेन्नई सुपर किंग्जची होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने १६व्या मोसमात मैदानावर शानदार कामगिरी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियाच्या संदर्भात इंटरएक्टिव्ह एव्हेन्यूजच्या अहवालानुसार, आयपीएलच्या संपूर्ण हंगामात चेन्नई सुपर किंग्जची सर्वाधिक चर्चा झाली. सीएसके संघाला ७.६ दशलक्ष वेळा मेंशन करण्यात आले. त्याचबरबर चेन्नई संघ ९८ दशलक्ष एंगेजमेंटसह सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेला संघ बनला. या संपूर्ण मोसमात, सीएसके संघ ज्याही स्टेडियमवर खेळायला गेला, ते स्टेडियम पूर्णपणे पिवळ्या रंगात न्हाऊन गेले.

धोनीच्या नेतृत्वाखालील विजेतेपदाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून गुजरात टायटन्स संघाचा ५ विकेट्सने पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २१४ धावा केल्या होत्या. पावसामुळे या सामन्यावर परिणाम झाला. त्यामुळेच चेन्नईला डकवर्थ लुईस नियमानुसार वेगळे टार्गेट देण्यात आले होते. जे चेन्नईने १५ षटकात १७१ धावा करत पूर्ण केले. यासह, आयपीएल इतिहासात सर्वाधिक जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्ससह संघ आता पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आतापर्यंत ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे.

हेही वाचा – Rinku Singh: ”रिंकू बाप है, बच्चा नहीं”, चाहत्याच्या ‘या’ प्रश्नाला शाहरुख खानने दिले जबरदस्त उत्तर

गुजरात आणि मुंबई संघ कोणत्या क्रमांकावर राहिले?

सीएसकेनंतर, गुजरात टायटन्सचा संघ सोशल मीडियावर संपूर्ण हंगामात सर्वाधिक चर्चेत असलेला संघ म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहिला. कर्णधार हार्दिक पांड्याच्या संघाला ६.२ दशलक्ष मेंशन आणि ५३ दशलक्ष एंगेजमेंट मिळाले. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा संघ यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. मुंबई संघाबाबत सोशल मीडियावर ५.४ दशलक्ष मेंशन आणि ६९ दशलक्ष एंगेजमेंट पाहिला मिळाली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to interactive avenues report on social media csk has become most talked about team in ipl 2023 vbm
Show comments