बंगळूरु : विश्वचषक स्पर्धेत भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत सर्वोत्तम अशीच कामगिरी केली असून, सामन्याच्या विविध परिस्थितीत कोणत्याही आव्हानाचा सामना करण्याची क्षमता भारतीय गोलंदाजांमध्ये असल्याची प्रतिक्रिया भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी दिली.‘‘वेगवान असो किंवा फिरकी गोलंदाजी भारताने या दोन्ही आघाडय़ांवर वर्चस्व राखले आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्येही सर्वोत्तम मारा करण्याची क्षमता आमच्या गोलंदाजांमध्ये आहे. विशेष म्हणजे विविध स्वरूपाच्या खेळपट्टीवरही ते भेदक मारा करू शकतात. हे या स्पर्धेतून सिद्ध झाले आहे,’’ असे म्हाम्ब्रे यांनी सांगितले.वेगवान गोलंदाजांचे कौतुक करताना म्हांब्रेनी बुमराच्या दोन्ही बाजूने चेंडू स्विंग, तर शमीच्या सीम करण्याच्या कौशल्याचे कौतुक केले.

‘‘बुमराचे चेंडू आत टाकायचे आणि बाहेर काढण्याचे कौशल्य कमाल आहे. शमी चेंडूच्या शिवणीचा जबरदस्त उपयोग करून घेत आहे. सिराजकडे चेंडू टाकण्याची विविधता आली आहे,’’ असे म्हाम्ब्रे यांनी सांगितले.फिरकी गोलंदाजीत जडेजाने कमालीची अचूकता दाखवली, तर कुलदीपने स्वत:मध्ये बदल घडवताना चेंडूला वेग देण्याची कला चांगली अवगत केली आहे. त्यामुळे फलंदाज त्याचे चेंडू सहजपणे पुढे येऊन खेळू शकत नाही, असे सांगितले.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार

हेही वाचा >>>World Cup 2023, IND vs NZ :भारताचे अंतिम फेरीचे लक्ष्य! उद्या न्यूझीलंडविरुद्ध पहिला उपांत्य सामना; फलंदाजांच्या कामगिरीकडे नजर

अश्विनला बाहेर ठेवण्याचा निर्णय कठीण होता. पण, खेळत असो वा नसो अश्विनने खेळाडू म्हणून खूप चांगले योगदान दिले आहे. तो सातत्याने गोलंदाजांना मार्गदर्शन करताना दिसून आला. वेळोवेळी त्याने गोलंदाजांना सूचनाही केल्या. तो खेळत नसला, तरी भारताचा विजयवीर गोलंदाज आहे.  – पारस म्हाम्ब्रे