बंगळूरु : विश्वचषक स्पर्धेत भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत सर्वोत्तम अशीच कामगिरी केली असून, सामन्याच्या विविध परिस्थितीत कोणत्याही आव्हानाचा सामना करण्याची क्षमता भारतीय गोलंदाजांमध्ये असल्याची प्रतिक्रिया भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी दिली.‘‘वेगवान असो किंवा फिरकी गोलंदाजी भारताने या दोन्ही आघाडय़ांवर वर्चस्व राखले आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्येही सर्वोत्तम मारा करण्याची क्षमता आमच्या गोलंदाजांमध्ये आहे. विशेष म्हणजे विविध स्वरूपाच्या खेळपट्टीवरही ते भेदक मारा करू शकतात. हे या स्पर्धेतून सिद्ध झाले आहे,’’ असे म्हाम्ब्रे यांनी सांगितले.वेगवान गोलंदाजांचे कौतुक करताना म्हांब्रेनी बुमराच्या दोन्ही बाजूने चेंडू स्विंग, तर शमीच्या सीम करण्याच्या कौशल्याचे कौतुक केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in