Jofra Archer recovers from injury: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार आहे. यावेळी क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या महाकुंभात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक देखील राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवला जाईल. या स्पर्धेत इंग्लंडचा संघ पहिला सामना ५ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. तत्पुर्वी, इंग्लंडसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी तंदुरुस्त झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयसीसी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर भारत दौऱ्यासाठी राष्ट्रीय संघात पुनरागमन करू शकतो. पाठीच्या फ्रॅक्चरमुळे आर्चरला सतत संघात राहण्यात अपयश आले आहे. आर्चरने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडच्या दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यांमध्ये आपले कौशल्य दाखवले, तेव्हा त्याने त्याच्या असामान्य प्रतिभेची झलक दाखवली. तथापि, आर्चरला आणखी एक धक्का बसला, जेव्हा त्याला दुखापतीमुळे आयपीएल २०२३ मधील मुंबई इंडियन्ससोबतची मोहीम संपवावी लागली.

उजव्या कोपराला दुखापत आणि स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे आर्चर इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या अॅशेस मालिकेचा भागही होऊ शकला नाही. दरम्यान, त्याच्या देशांतर्गत संघ ससेक्सचे प्रमुख पॉल फारब्रेसने आशा व्यक्त केली आहे की, आर्चर भारतात आगामी विश्वचषक २०२३ साठी इंग्लंड संघात स्थान मिळविण्यासाठी सकारात्मक आहे.

हेही वाचा – Ben Stokes: अ‍ॅम अ बार्बी गर्ल… बेन स्टोक्सची पत्रकार परिषद मार्क वुडने केली हायजॅक; मजेशीर Video व्हायरल

बीबीसी रेडिओ 5 लाइव्हवर बोलताना पॉल फारब्रेस म्हणाले,”तो चांगली कामगिरी करत आहे. मला वाटते की तो विश्वचषकासाठी सज्ज आहे, ही चांगली बातमी आहे. मला वाटतं, इंग्लंडला पुढच्या अॅशेस मालिकेत जायचे असेल, तर त्यांना पुढील काही वर्षांत त्यातून सर्वोत्तम कसे मिळवायचे यावर काम करावे लागेल.” आर्चरच्या कामाचा ताण प्रभावीपणे हाताळण्याचे आव्हान इंग्लंड व्यवस्थापन आणि कोचिंग स्टाफसमोर असेल. जेणेकरून त्याचा फिटनेस आणि फॉर्म दीर्घकाळ टिकेल याची खात्री होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to paul farbrace jofra archer will make a comeback in eng team before the 2023 odi wc vbm