Saba Karim Ravindra Jadeja should have been given vice captaincy instead of Ajinkya Rahane: भारत आणि वेस्ट इंडिज संघांत १२ जुलैपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसआयने १६ सदस्सीय टीम इंडियाची घोषणा केली आहे. या मालिकेत रोहित शर्माकडे कर्णधारपद, तर अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपद सोपवल्याने माजी निवडकर्ता खूश नाही. त्याने रहाणेला उपकर्णधारपद देण्यात आल्याने प्रश्न उपस्थित केला आहे.
सबा करीबने उपस्थित केला सवाल –
कसोटी संघातील उपकर्णधारपद स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे सोपवायला हवे, असे मत माजी भारतीय क्रिकेटपटू आणि निवडकर्ता सबा करीम यांनी व्यक्त केले. रवींद्र जडेजाला भारतीय कसोटी कर्णधार म्हणून निवडकर्ते पाहत नसतील, तर गिलला उपकर्णधारपद सोपवायला हवे होते, कारण तो भारतीय संघाचे भविष्य मानला जातो, असे त्याचे मत आहे.
जडेजाला उपकर्णधारपद मिळायला हवे होते –
सबा करीमने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, “मला माहित नाही की लोक रवींद्र जडेजाबद्दल का बोलत नाहीत. तो भारतीय संघासाठी सर्व फॉरमॅटमधील नियमित खेळाडू आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या यशातही त्याचा मोठा वाटा आहे. मग लीडर म्हणून त्यांच्याबद्दल कधीच का बोलले गेले नाही? तो भारतीय संघातील एक न बदलता येणारा खेळाडू आहे आणि राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्यासही तो तितकाच सक्षम आहे.”
अजिंक्य रहाणेने अलीकडेच चमकदार कामगिरी केली –
अजिंक्य रहाणे दीर्घ काळानंतर टीम इंडियात परतला आहे. संघात प्रवेश करताच त्याच्याकडे पुन्हा एकदा उपकर्णधारपद देण्यात आले. देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरी आणि आयपीएलमधील अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर त्याने टीम इंडियामध्ये पुन्हा स्थान मिळवले आहे. रहाणेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा (८९, ४६) केल्या, ज्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्थान मिळाले.