According to BCCI Rinku Singh to be selected for Ireland tour: बीसीसीआयने दोन दिवसांपूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाचा टी-२० संघ जाहीर केला. या संघात कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार खेळाडू रिंकू सिंगला संधी मिळाली नाही. टी-२० संघाच्या निवडीपूर्वी रिंकू सिंगला वेस्ट इंडिजविरुद्ध संधी मिळेल, असे बोलले जात होते, मात्र तसे झाले नाही. रिंकूला टीम इंडियामध्ये संधी न मिळाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये रागही दिसून आला. आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. पुढील मालिकेत रिंकू सिंगचा टीम इंडियात समावेश होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिंकू सिंग वेस्ट इंडिजच नव्हे तर आयर्लंड दौऱ्यावर करणार पदार्पण –

रिंकू सिंगने वेस्ट इंडिजसमोर पदार्पण करावे असे बीसीसीआयला वाटत नव्हते. केकेआरचा हा फलंदाज आणि उर्वरित युवा खेळाडूंना आयर्लंडविरुद्धच्या तीन टी-२० मालिकेत संधी दिली जाईल. अशी माहिती बीसीसीआयच्या एक सूत्राने इंडियन एक्सप्रेसला दिली. आयर्लंडविरुद्धची टी-२० मालिका १८ ते २३ ऑगस्ट दरम्यान आयर्लंडमध्ये खेळवली जाणार आहे.

टीम इंडियाचा युवा संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार –

बीसीसीआयच्या एका सूत्राने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “रिंकू सिंग आणि इतर खेळाडू ज्यांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे, ते आयर्लंड दौऱ्यावर जातील. निवड समिती सर्वांना एकाच मालिकेत आजमावू इच्छित नाही. वनडे संघात असे सात खेळाडू आहेत जे टी-२० खेळणार नाहीत. आमचे लक्ष ऑगस्टच्या अखेरीस होणाऱ्या आशिया चषकावर आहे.” बीसीसीआयच्या निवड समितीला भारत अ संघाचे अधिकाधिक दौरे आयोजित करायचे आहेत. या दौऱ्यांमध्ये युवा खेळाडूंनाही संधी दिली जाणार आहे.

हेही वाचा – ENG vs AUS 3rd Test: ‘ऑस्ट्रेलियन लोक माझा तिरस्कार…’, शतकानंतर मिशेल मार्शचा VIDEO व्हायरल

आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी –

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आयपीएल स्टार यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांना टीम इंडियात स्थान मिळाले आहे. जैस्वाल राजस्थान रॉयल्सचा, तर तिलक वर्मा मुंबई इंडियन्सचा भाग होता. या दोन्ही फलंदाजांनी आयपीएलच्या सोळाव्या हंगामामध्ये चमकदार कामगिरी केली होती.

हेही वाचा – ENG vs AUS 3rd Test: ‘ऑस्ट्रेलियन लोक माझा तिरस्कार…’, शतकानंतर मिशेल मार्शचा VIDEO व्हायरल

आयपीएलमध्ये दिसला होता रिंकू सिंगचा दबदबा –

रिंकू सिंगने आयपीएल २०२३ मध्ये शानदार खेळ प्रदर्शन केले. कोलकाता नाइट रायडर्ससाठी, रिंकूने आयपीएल २०२३ मध्ये १४ सामने खेळले आणि एकूण ४७४ धावा केल्या. या दरम्यान रिंकूचा स्ट्राईक रेट १४९.५३ होता. गुजरातविरुद्धच्या सामन्यात रिंकूने शेवटच्या षटकात सलग ५ षटकार ठोकले होते, ज्यामुळे तो रातोरात आयपीएलचा सर्वात मोठा सुपरस्टार बनला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to the bcci source rinku singh will be selected in team india for the tour of ireland vbm