Virat Kohli’s Advice to Team India Batsmen: आशिया कप २०२३ स्पर्धेतील तिसरा सामना २ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान संघांत खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने बाबरच्या नेतृत्त्वाखालील संघाच्या गोलंदाजी आक्रमणाचे कौतुक केले. माजी कर्णधार म्हणाला की, पाकिस्तानच्या गोलंदाजांचा सामना करताना सतत स्विच ऑन राहणे खूप महत्वाचे आहे. भारतीय संघ आपल्या आशिया चषक २०२३ मोहिमेची सुरुवात शनिवारी, २ सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील पल्लेकेले येथे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने करेल.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी कोहली स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला, “माझ्या मते गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे. आणि त्यांच्याकडे काही प्रभावी गोलंदाज आहेत, जे त्यांच्या कौशल्याच्या आधारे कधीही खेळाचा मार्ग बदलू शकतात. त्यामुळे तुम्हाला त्यांचा सामना करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील.” आशिया चषक स्पर्धेत शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि नसीम शाह यांसारखे गोलंदाज असलेले पाकिस्तान संघ वेगवान आक्रमणासह उतरत आहे. त्याचबरोबर संघाचा लेगस्पिनर शादाब खानही चांगली कामगिरी करत आहे.

IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी

कोहली त्याच्या कामगिरीवर कधीच समाधानी नसतो –

विराट कोहली म्हणाला की, आपल्या कामगिरीवर आत्मसंतुष्ट न राहता खेळ सुधारण्यासाठी आणि संघासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी नवीन मार्ग शोधणे महत्त्वाचे आहे. तो म्हणाला, “मी माझा खेळ कसा सुधारू शकतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक दिवस, प्रत्येक सराव सत्र, प्रत्येक वर्षी, प्रत्येक हंगाम, यामुळेच मला माझ्या संघासाठी चांगले खेळण्यास आणि इतके दिवस परफॉर्म करण्यास मदत झाली आहे.”

हेही वाचा – UPL 2023; ६,६,६…सुपर ओव्हरमध्ये रिंकू सिंगचा कहर, षटकारांची बरसात करुन संघाला मिळवून दिला रोमहर्षक विजय

कोहली म्हणाला, “मला वाटत नाही की तुम्ही त्या मानसिकतेशिवाय सातत्यपूर्ण कामगिरी करू शकता. कारण जर तुमची कामगिरी तुमचे एकमेव ध्येय असेल, तर तुम्ही आत्मसंतुष्ट होऊ शकता आणि कठोर परिश्रम करणे थांबवू शकता. त्याला मर्यादा नाही.” गेल्या वर्षी मेलबर्नमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात विराटने पाकिस्तानविरुद्ध ५३ चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळी केली होती. ही खेळी कोहलीच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी मानली जाते. आता कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्याचे लक्ष्य ठेवणार आहे.

हेही वाचा – IND vs PAK: विराट-रोहित जोडी इतिहास रचण्यापासून फक्त दोन पावले दूर, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात करू शकते ‘हा’ कारनामा

विराट पुढे म्हणाला, “तुम्ही एका विशिष्ट स्तरावर पोहोचलात, तर तुम्ही उत्कृष्टतेपर्यंत पोहोचलात अशी कोणतीही निश्चित कामगिरी नाही. मला असे वाटते की, मी दररोज चांगले होण्यासाठी प्रयत्नशील आहे, म्हणून हा शब्द वापरण्यासाठी अधिक चांगला आहे आणि हो, कामगिरी ही साहजिकच उपउत्पादन बनते. कारण ‘या परिस्थितीतून मी माझ्या संघाला विजय कसा मिळवून देऊ?’, अशी तुमची मानसिकता आहे.”