Arshdeep Singh should play more first-class cricket to increase his pace: पंजाब किंग्जचा खेळाडू अर्शदीप सिंग अनेकदा आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करतो. त्याचबरोबर या वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. ज्यासाठी टीम इंडिया आपल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनवर लक्ष केंद्रित करत आहे. अशात पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगची स्तुती करताना खूप काही बोलला आहे. वसीम अक्रम अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीने खूप प्रभावित झाला आहे. त्याने या खेळाडूचे भारताचे भविष्य असे वर्णन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्शदीप सिंगने जास्तीत जास्त प्रथम श्रेणी क्रिकेट खेळावे –

रेडिओ हांजीवर बोलताना वसीम अक्रम म्हणाला की, ‘मी त्याला पाहिले आहे. त्याला चांगले भविष्य आहे. किंबहुना, गेल्या वर्षी आशिया चषकादरम्यानही मी म्हटले होते की, त्याने यापुढे खेळावे. त्याच्याकडे स्विंग आहे पण वेगाच्या बाबतीत, त्याला वेग वाढवण्यासाठी अधिक प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची गरज आहे. तो तरुण आहे आणि त्याची गोलंदाजी मला आवडते.’

हेही वाचा – World Cup 2023: ‘बुमराह खेळला नाही तर विश्वचषक…’, टीम इंडियाच्या माजी खेळाडूच मोठं वक्तव्य

वसीम अक्रम म्हणाला की, अर्शदीप सिंग हा विकेट घेणारा गोलंदाज आहे. टीम इंडियामध्ये त्याचे भविष्य नक्कीच चांगले आहे. त्यामुळे तो जितका जास्त खेळेल तितका वेग तो निर्माण करू शकेल. अर्शदीप सिंग वेस्‍ट इंडिजविरुद्ध टी-२० मध्‍ये भारताकडून खेळताना दिसू शकतो. वास्तविक अर्शदीप सिंगने फेब्रुवारी २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारतासाठी शेवटचा टी-२० सामना खेळला होता.

टीम इंडिया डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाच्या शोधात –

झहीर खानच्या क्रिकेटमधून निवृत्तीनंतर भारताला एका मजबूत डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाच्या शोधात आहे. ज्यासाठी मेन इन ब्लूने बरिंदर स्रान, खलील अहमद आणि चेतन साकारिया सारख्या काही खेळाडूंना संधी दिली परंतु शेवटी अर्शदीप सिंगवर लक्ष केंद्रित केले. वास्तविक, पंजाबच्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या टी-२० कारकिर्दीत चांगली कामगिरी केली आहे आणि २६ सामन्यांत ८.४० च्या इकॉनॉमी रेटने ४१ विकेट घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to wasim akram arshdeep singh should play more first class cricket to increase his pace vbm