Zaheer Khan thinks Australia will benefit in the World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. झहीर खानला विश्वास आहे की, ऑस्ट्रेलियन संघात अष्टपैलू खेळाडूंच्या उपस्थितीमुळे या संघाला एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये अतिरिक्त फायदा मिळेल. तो म्हणाला की, पॅट कमिन्सचा संघ अतिशय संतुलित आणि खूप मजबूत आहे. या संघात खूप खोली आहे आणि बरेच खेळाडू मॅच विनर आहेत. झहीर खानने क्रिकबझशी बोलताना ही माहिती दिली.
अष्टपैलू खेळाडूमुळे कांगारू संघाला सर्वाधिक फायदा होणार –
झहीर खान म्हणाला की, ऑस्ट्रेलियाकडे एकदिवसीय विश्वचषकासाठी एक उत्कृष्ट संघ आहे. विशेषत: त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडूंची मोठी यादी आहे, जी संघासाठी अधिक फायदेशीर ठरेल. कॅमेरून ग्रीन, मिचेल मार्श, मार्कस स्टॉइनिस यांच्यासोबत ग्लेन मॅक्सवेलही संघात पुनरागमन करण्यास तयार आहे. कॅमेरॉन ग्रीन हा त्यांच्या आक्रमक अव्वल फलंदाजांपैकी एक आहे जो तुम्हाला गोलंदाज म्हणून स्थिर होऊ देत नाही आणि सीन अॅबॉट हा एक चांगला खेळाडू आहे, जो त्याच्या संघाला अधिक ताकद देतो.
झहीर पुढे खान म्हणाला की, भारतात आपण हार्दिक पांड्याबद्दल बोलतो जो संघासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु कांगारू संघात २-३ खेळाडू आहेत. जे उत्कृष्ट अष्टपैलू आहेत आणि म्हणूनच त्यांना २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत इतर संघांपेक्षा अधिक फायदा होणार आहे. मात्र, दुखापती ही या संघासाठी चिंतेची बाब आहे. कारण एकदिवसीय विश्वचषकापूर्वी चांगल्या फॉर्ममध्ये असलेला स्टार सलामीवीर ट्रॅव्हिस हेड बोट तुटल्यामुळे विश्वचषकाच्या पूर्वार्धातून बाहेर पडला आहे, तर काही प्रमुख खेळाडू त्याच्या दुखापतीतून संघात परतले आहेत.
हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियन दिग्गजांना नेट प्रॅक्टिसमध्ये आपल्या गोलंदाजीने चकीत करणारा, कोण आहे समीर खान?
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतात दाखल झाला आहे. कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचे आयोजन केले आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी मोहाली येथे खेळला जात आहे. ही मालिका विश्वचषकाच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाची असणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय विश्वचषकासाठी संघ –
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.