Rajinikanth advised owner Kalanidhi Maran to get good players in SRH team: अभिनेते रजनीकांत यांनी आगामी ‘जेलर’ चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च दरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. रजनीकांत यांनी आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादची सीईओ काव्या मारनच्या भावनांबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की सामन्यादरम्यान काव्या निराश झालेले पाहू वाटत नाही. त्यामुळे संघाच्या मालकांना एक महत्त्वाचा सल्लाही दिला आहे.

अभिनेते रजनीकांत यांनी आयपीएल सामन्यांमध्ये संघाचा पराभव पाहता एसआरएचची सीईओ काव्या मारनच्या भावनांबद्दल चिंता व्यक्त केली. खरं तर, हैदराबाद फ्रँचायझीचे मालक कलानिधी मारिन यांची मुलगी काव्या अनेकदा सामन्यांच्या वेळी स्टेडियममध्ये हजर असते. तसेच जेव्हा-जेव्हा संघ कठीण परिस्थितीत असतो तेव्हा ती अनेकदा नाराज झालेली दिसते.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
union minister nitin gadkari interview for loksatta ahead of Maharashtra Assembly Election 2024
व्यक्तिगत लाभाच्या योजनांकडे सर्वच पक्षांची धाव!
maharashtra assembly election 2024 maha vikas aghadi vs mahayuti battle in konkan region
विश्लेषण : कोकणात लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती महायुती दाखवणार का? महाविकास आघाडीला संधी किती?
Supriya Sule, Devendra Fadnavis,
दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता; सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल
Rohit Pawar scandal regarding 32 IT companies in Hinjewadi
“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार”; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, गेल्या दहा वर्षात एक ही…!

रजनीकांत यांनी काव्याचे वडील कलानिथी मारन यांना संघाची कामगिरी वाढवण्यासाठी अधिक चांगल्या खेळाडूंच्या नियुक्तीचा विचार करण्याचा सल्लाही दिला. रजनीकांत म्हणाले, “कलानिधी मारन यांनी सनरायझर्स हैदराबाद संघात चांगले खेळाडू ठेवावेत. आयपीएलदरम्यान काव्याला टीव्हीवर अस पाहून वाईट वाटते.”

गेल्या काही आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आयपीएल २०२३ मध्ये संघाची कामगिरीही खराब होती, जिथे एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली, संघ १४ सामन्यांतून केवळ चार विजयांसह गुणतालिकेत तळाशी राहिला होता.काव्या मारनच्या नेतृत्वाखाली आयपीएल लिलावादरम्यान फ्रँचायझीची कामगिरीही चिंतेचे कारण ठरली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यमसन तसेच जॉनी बेअरस्टो आणि राशिद खान सारख्या चाहत्यांच्या आवडत्या स्टार खेळाडूंना कायम न ठेवल्याबद्दल एसआरएच संघाला चाहत्यांच्या टीकेचा सामना करावा लागला आहे.

हेही वाचा – IND vs WI 2nd ODI: नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा गोलंदाजीचा निर्णय, रोहित-विराट भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

२०१९ मध्ये वॉर्नरच्या नेतृत्वाखाली पहिले आयपीएल जेतेपद पटकावल्यानंतर हैदराबाद संघाच्या कामगिरीचा आलेख खूपच खाली गेला आहे. २०२१ आणि २०२३ मध्ये, संघ सातत्याने टेबलच्या तळाशी आहे, तर २०२२ मध्ये ते आठव्या स्थानावर होते. वॉर्नरपासून विल्यमसन आणि नंतर मार्करामपर्यंत कर्णधाराच्या भूमिकेत बदल होऊनही संघाची ऑनफिल्ड कामगिरी कायम राहिली.

हेही वाचा – ENG vs AUS 5th Test: स्टुअर्ट ब्रॉडने ‘या’ खास ट्रिकने मार्नस लाबुशेनला केले आऊट, VIDEO होतोय व्हायरल

वॉर्नर आणि विल्यमसनला सोडण्याचा निर्णय आश्चर्यकारक होता. त्याचवेळी, या निर्णयामागील अंतर्गत भूमिकेबद्दलचा विषय चाहत्यांसाठी चर्चेचा राहिला आहे. आयपीएल २०२३ मध्ये मार्कराम संघाचे नेतृत्व करत असूनही, एसआरएच संघाचे नशीब बदलले नाही, ज्यामुळे चाहते आणि व्यवस्थापन यांच्यातील तणाव वाढला आहे