India vs Australia 2023 1st ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. हा सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी पोहोचले आहेत. त्यापैकी एक म्हणजे थलायवा म्हणजेच दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत. पांढरा टी-शर्ट आणि काळी पँट घातलेले रजनीकांत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्यासोबत बसलेले दिसले. रजनीकांत त्यांच्या क्रिकेट प्रेमासाठी ओळखले जातात. ते अनेकदा चेन्नईत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना हजेरी लावतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात खेळत नाहीये. त्याच्या जागी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. हार्दिक पांड्याने टी-२० मध्ये कर्णधारपद भूषवले असले तरी तो प्रथमच वनडे फॉरमॅटमध्ये कर्णधार आहे. यासह, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणारा २७ वा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर तो कपिल, धोनी, कोहली यासारख्या दिग्गजांच्या यादीत सामील झाला आहे. त्याच्या एकदिवसीय कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील पहिली नाणेफेकही त्याने जिंकली आहे.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आपल्या कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवताना संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलिया पहिला धक्का दिला. त्याने ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले. ट्रॅव्हिस हेडने १० चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ५ धावा केल्या. त्यानंतर स्मिथ आणि मार्श या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावा जोडल्या. त्याने ३० चेंडूत चार चौकारांच्या मदतीन २२ धावा केल्या.

हेही वाचा – IND vs AUS 1st ODI: मोहम्मद सिराजचा धुमाकूळ! दुसऱ्याच षटकात ट्रेविस हेडला केले क्लिन बोल्ड, पाहा VIDEO

त्यानंतर मिचेल मार्शने ५३ चेंडूत नाबाद ५७ धावांचे योगदान दिले. या खेळीत आठ चौकार तीन षटकार लगावले. त्याचबरोबर मार्नस लाबूशेन ८ धावांवर खेळत आहे. त्याचबरोबर संघाची धावसंख्या १७.२ षटकानंतर २ बाद १०४ धावा केल्या आहेत. भारताकडून गोलंदाजी करताना कर्णधार हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी १-१ विकेट घेतली आहे.

पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

भारत: शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor rajinikanth present for the first odi between india vs australia vbm