तेलुगू सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लायगर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट मागच्या काही काळापासून खूप चर्चेत होता. परंतु तो प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला नाही आणि बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. अनन्या पांडे आणि विजयची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करेल, असा अंदाज वर्तवला जात होता, पण चित्रपट तसं झालं नाही. दरम्यान, चित्रपट फ्लॉप झाल्याची चिंता सोडून विजय रविवारी झालेल्या आशिया चषकातील भारत पाकिस्तान सामन्याला उपस्थित होता. तिथे बोलताना विजयने एका भारतीय क्रिकेटपटूच्या बायोपिकमध्ये काम करण्याची मनापासून इच्छा व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “अनन्या पांडे आणि श्रद्धाने मेहनत करून…”; शक्ती कपूर यांचं वक्तव्य चर्चेत

रविवारी २८ ऑगस्ट २०२२ रोजी दुबई येथे झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक सामन्यात स्टेडियममध्ये बसून विजय भारतीय क्रिकेट संघाला सपोर्ट करताना दिसला. या सामन्यापूर्वी विजयने आपली इच्छा व्यक्त करत भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. कोणत्या क्रिकेटपटूवरील बायोपिकमध्ये काम करायला आवडेल, असा प्रश्न प्री-मॅच शोमध्ये विजयला विचारण्यात आला होता. त्यावर त्याने विराट कोहलीचं नाव घेतलं.

हेही वाचा – “माझ्या आयुष्यात…”; सीमा सचदेवाने पहिल्यांदा सांगितलं सोहेल खानपासून विभक्त होण्याचं कारण

याआधी क्रिकेटपटू एमएस धोनी आणि मिताली राज यांचा बायोपिक बनवण्यात आला आहे. धोनीच्या बायोपिकमध्ये सुशांत सिंह राजपूत, तर मितालीच्या बायोपिकमध्ये तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसले होते. आता विजयच्या विराटच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काळात विजय आणि विराटच्या चाहत्यांना बायोपिक पाहायला मिळू शकते. दरम्यान, विजयने जरी विराटच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली असेल, तरी विराट कोहलीने आजपर्यंत कधीही आपल्या जीवनावर बायोपिक बनवावा, अशी इच्छा व्यक्त केलेली नाही.