ईशा केसकर

क्रिकेटमध्ये फलंदाज एक टप्पा बाद का नसतो? यांसारखे अनेक प्रश्न विचारून मी लहानपणी क्रिकेटवरून बाबांना सारखी भंडावून सोडायचे. लहान असताना मला पायचीतचे नियम फारसे समजायचे नाहीत. पण हळूहळू क्रिकेटची आवड निर्माण झाल्यानंतर सारे काही समजू लागले आहे. यंदाचा विश्वचषक कोण जिंकणार, यावरून आमच्या मित्रमंडळींमध्ये चर्चेला उधाण आले आहे. भारताचा संघ शक्तिशाली असल्याने आपल्याला कुणीही सहज हरवू शकणार नाही. महेंद्रसिंह धोनी हा माझा आवडता खेळाडू आहे. त्याचा हा अखेरचा विश्वचषक असला तरी त्याने  निवृत्त होऊच नये, असे मला वाटते. हल्ली देशभावना जागवणारे खूपच कमी विषय उरले आहेत, त्यात क्रिकेटचा क्रमांक सर्वात वरचा आहे. प्रत्येकाच्या क्रिकेटच्या असंख्य आठवणी असतात. देशातील प्रत्येक जण क्रिकेटशी बांधला गेलेला आहे. म्हणूनच सर्वच जण विश्वचषकाची चातकाप्रमाणे वाट पाहातात.

 (शब्दांकन : भक्ती परब)