बॉलिवूड अभिनेत्री राकुल प्रीत सिंग सध्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. तिथे तिने दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांच्यासोबत गोल्फ खेळण्याचा आनंद लुटला. विशेष म्हणजे या दोघांना अध्यात्मिक गुरू सद्गुरू यांनी देखील साथ दिली. राकुलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर कपिल देव यांच्यासोबत गोल्फ खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
राकुल प्रीत सिंग राष्ट्रीय स्तरावरील गोल्फर होती. त्यामुळे आताही ती जेव्हा संधी मिळते तेव्हा गोल्फ खेळत असते. आता अमेरिकेत देखील संधी मिळाल्यानंतर ती कपिल देव यांच्यासोबत गोल्फ खेळली. राकुलने व्हिडीओ कॅप्शनमध्ये लिहिले की, “वॉशिंग्टन डीसीमध्ये सद्गुरू आणि कपिल देव यांच्यासोबत अमेरिकन तेलगू असोसिएशन कन्व्हेशनची सुरुवात करण्याची संधी मिळण्यापेक्षा चांगले काय असू शकते?”
अभिनेता आयुष्मान खुराना आणि इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसन यांनीही राकुल प्रीत सिंगच्या पोस्टवर कमेंट केली आहे. राकुल, कपिल देव आणि सद्गुरूंचा हा व्हिडीओ २१ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.