Adam Zampa became the second highest wicket taker in an ODI World Cup: ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ॲडम झाम्पा २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. त्याने ९ साखळी सामन्यांमध्ये २२ विकेट्स घेतल्या आहेत. बांगलादेशविरुद्धच्या साखळी सामन्यातही त्याने १० षटकांत ३२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. या सामन्यात बांगलादेश संघाने ५० षटकात ८ विकेट्स गमावत ३०६ धावा केल्या. या सामन्यात त्याच्या २ विकेट्ससह, झाम्पाने शाहिद आफ्रिदी आणि ब्रॅड हॉगचा विक्रम मोडला. त्याचबरोबर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या एकाच हंगामात कांगारू संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा फिरकी गोलंदाज ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ॲडम झाम्पाने शाहिद आफ्रिदीला मागे टाकले –

ॲडम झाम्पाने बांगलादेशविरुद्ध २ विकेट्स घेऊन शाहिद आफ्रिदी आणि ब्रॅड हॉग यांना मागे टाकले. तसेच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत फिरकी गोलंदाज म्हणून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. झाम्पाने विश्वचषकाच्या या मोसमात आतापर्यंत २२ विकेट घेतल्या आहेत, तर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शाहिद आफ्रिदीने २०११ मध्ये २१ विकेट घेतल्या होत्या, तर हॉगने देखील २००७ मध्ये २१ विकेट घेतल्या होत्या. ॲडम झाम्पाने दोघांनाही मागे टाकताच दोघेही संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आले.

हेही वाचा – Team India: भारतीय खेळाडूंनी घेतला ‘फुटवॉली’चा आनंद, गिलला मारण्यासाठी सिराज खुर्ची घेऊन धावला, पाहा VIDEO

एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच मोसमात फिरकी गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आहे. ज्याने २००७ साली २३ विकेट्स घेतल्या होत्या. या मोसमात झाम्पाला आता त्याला मागे टाकण्याची चांगली संधी आहे. झाम्पाने या विश्वचषकात आणखी २ विकेट घेतल्यास, तो मुरलीधरनचा विक्रम मोडेल आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू बनेल.

एका विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे फिरकीपटू –

२३ विकेट्स – मुथय्या मुरलीधरन (२००७)
२२ विकेट्स – ॲडम झम्पा (२०२३)
२१ विकेट्स – ब्रॅड हॉग (२००७)
२१ विकेट्स – शाहिद आफ्रिदी (२०११)
२० विकेट्स – शेन वॉर्न (१९९९)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adam zampa became the second highest wicket taker in an odi world cup behind shahid afridi and brad hogg vbm