‘भारतीय अॅथलेटिक्सची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. मात्र, राज्यातील असंतुष्ट व्यक्ती उगाच अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्यक्तींमुळे खेळाचे आणि खेळाडूंचे नुकसान होत आहे. भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या (एएफआय) सदस्यांनी अशा अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी काही नियमावली तयार केली आहे. त्याचे काटेकोर पालन न करणाऱ्या राज्य आणि जिल्हा संघटनांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. खेळाच्या विकासात खोडा घालणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही,’ असा सज्जड दम एएफआयच्या अध्यक्षपदावर पुनर्नियुक्ती झालेल्या आदिल सुमारीवाला यांनी दिला. अध्यक्षपदावर पुन्हा विराजमान झालेल्या सुमारीवालांचा संपूर्ण रोख महाराष्ट्रात त्यांच्याविरोधात मोहीम चालवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध होता. २०१६-२० या कालावधीत पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज झालेल्या सुमारीवाला यांच्याशी केलेली बातचीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा