Aditi Hundia shared a photo of Ishan Kishan from Ind vs Pak match: आशिया कप २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात इशान किशनने धडाकेबाज खेळी खेळली. इशानच्या खेळीचे सर्वांनी कौतुक केले, मात्र सोशल मीडियावर त्याची प्रशंसा करणाऱ्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वास्तविक, इशानच्या इनिंग दरम्यान, एका मॉडेलने त्याचा फोटो क्लिक केला आणि हृदयाच्या इमोजीसह इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला. यानंतर चर्चा सुरू झाली की इशान आणि मॉडेलमध्ये काहीतरी आहे किंवा मॉडेलचे प्रेम इतर चाहत्यांप्रमाणेच आहे.

वास्तविक, या मॉडेलसोबत इशान किशनचे अफेअर असल्याची अफवा आहे. कारण ही मॉडेल अनेक वेळा इशान किशनसोबत दिसली आहे. बरं, या अफेअरबद्दलची केवळ अफवा आहे की ती सत्य आहे, हे नंतर कळेल पण सोशल मीडिया वापरकर्ते मॉडेलच्या इन्स्टाग्राम स्टोरीबद्दल सर्व प्रकारचे अंदाज लावत आहेत.

Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pakistani Cricketer Called Indian Players Kafirs Mohinder Amarnath Recounts 1978 Tour of Pakistan in His Memoir
भारतीय खेळाडू ‘काफिर’; पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड, भारताच्या माजी खेळाडूने सांगितला ‘तो’ प्रसंग
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
marathi actor siddharth khirid propose to girlfriend in goa
दोन देश, दोघांचं करिअरही वेगळं…; मराठी अभिनेत्याने गर्लफ्रेंडला गोव्यात घातली लग्नाची मागणी; म्हणाला, “२२ एप्रिल २०२२…”
Jasprit Bumrah Moment in BBL as Mark Waugh Points out Lockie Ferguson Unconventional Delivery Like Indian Pacer Video
VIDEO: यत्र तत्र बुमराह; लॉकी फर्ग्युसनलाही आवरला नाही जसप्रीत बुमराहची अ‍ॅक्शन कॉपी करण्याचा मोह
Yuvraj Singh Backs Rohit Sharma Virat Kohli Amid Heavy Criticism on Poor Form
VIDEO: रोहित-विराटच्या मदतीला धावला युवराज सिंग; ट्रोलर्सचा समाचार घेताना म्हणाला…

कोण आहे इन्स्टा स्टोरी शेअर करणारी मॉडेल?

इशान किशनच्या फोटोसह इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करणाऱ्या मॉडेलचे नाव अदिती हुंडिया आहे. काही दिवसांपासून तिचे नाव इशान किशनसोबत जोडले जात आहे. शनिवारी भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान इशान स्फोटक फलंदाजी करत असताना अदितीने त्याचा एक फोटो क्लिक केला आणि तो इन्स्टाग्राम स्टोरीवर हृदयाच्या इमोजीसह शेअर केला.

हेही वाचा – Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान गौतम गंभीरने केलेल्या ‘या’ वक्तव्यामुळे धोनीच्या चाहत्यांनी उडवली खिल्ली

फोटोमध्ये अदितीची लिव्हिंग रूम दिसत आहे, ज्यामध्ये एक मोठा एलईडी टीव्ही आहे. टीव्हीवर भारत-पाकिस्तान सामना सुरू आहे आणि स्क्रीनवर इशान किशन फलंदाजी करताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत अदितीने लिहिले, ”ड्रीम इनिंग, यू डिझर्वेट एव्हरी बिट ऑफ इट आणि बरेच काही.” यासोबतच आदितीने हृदयाच्या आणि हाताचा इमोजी शेअर केला आहे.

अदिती हुंडियाची इन्स्टाग्राम स्टोरी

कोण आहे अदिती हुंडिया?

आदिती हुंडिया ही व्यवसायाने मॉडेल आहे. २०१७ च्या ‘मिस इंडिया कॉन्टेस्ट’मध्ये तिने भाग घेतला होता आणि ती फायनलिस्ट होती. यानंतर तिने २०१८ मध्ये मिस सुपरनॅशनलचा किताब पटकावला. इशान आणि अदिती हुंडिया अनेक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. त्यामुळे ही इशान किशनची गर्लफ्रेंड असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – ‘आम्ही ट्रॉफी उचलली असून आशिया कपसाठी आम्ही तुमची वाट पाहतोय’; भारतीय हॉकी संघाचा रोहितच्या टीम इंडियाला खास संदेश

शनिवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात इशान किशनने ८१ चेंडूत ८२ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याने ही खेळी अशा वेळी खेळली, जेव्हा टीम इंडियाच्या चार विकेट अत्यंत कमी धावसंख्येवर पडल्या होत्या. यानंतर इशानने हार्दिक पांड्यासोबत १३६ धावांची शानदार भागीदारी रचली.

Story img Loader