आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीला हजेरी लावून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे, असा दावा आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणातील याचिकाकर्ता आदित्य वर्मा यांनी केला आहे.
बीसीसीआयतर्फे १८ नोव्हेंबरला चेन्नईत घेण्यात येणारी तातडीची कार्यकारिणीची बैठक ही बेकायदेशीर आहे, असे बीसीसीआयची मान्यता नसलेल्या क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहारचे सचिव वर्मा यांनी सांगितले.
‘‘श्रीनिवासन पुढील आदेश मिळेपर्यंत अध्यक्षपदावर कार्यरत राहू शकणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. परंतु तरीही ते दुबईत झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीला हजर राहिले होते,’’ असे वर्मा यांनी सांगितले.