Sri Lanka vs Afghanistan, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या ३०व्या सामन्यात आज अफगाणिस्तानचा सामना श्रीलंकेशी होत आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या अप्रतिम फिरकी गोलंदाजीने श्रीलंकेला अवघ्या २४१ धावांत रोखले असून विजयासाठी २४२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आपापले मागील सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांसाठी आजचा सामना ‘करो या मरो’ अशा स्वरूपाचा आहे.

कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने प्लेइंग-११मध्ये एक बदल केला आहे. नूर अहमदच्या जागी फजलहक फारुकीचा संघात समावेश केला आहे. दुसरीकडे, श्रीलंकेच्या कर्णधारानेही एक बदल केला आहे. वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराचे संघात पुनरागमन झाले आहे, दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. उपांत्य फेरीच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. अशा स्थितीत दोन्ही संघ विजयाची लय  कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पराभूत संघासाठी पुढील वाटचाल कठीण होणार आहे. गेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला तर श्रीलंकेने इंग्लंडचा पराभव केला होता.

Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Abhishek Sharma Century 2nd Fastest Hundred For India in just 37 Balls vs England
Abhishek Sharma Century: अभिषेक शर्माचं ऐतिहासिक शतक, षटकारांचा…
Jos Buttler Takes Dig at India After Pune Concussion Substitue of Harshit Rana in IND vs ENG
IND vs ENG: जोस बटलरने नाणेफेकीदरम्यान भारताला लगावला सणसणीत टोला, हर्षित राणाच्या मुद्द्यावरून पुन्हा सुनावलं
Rohit Sharma Viral Video of BCCI Awards on Smriti mandhana Question
VIDEO: “माझी बायको बघत असेल…”, विसरभोळ्या रोहित शर्माचं स्मृती मानधनाच्या प्रश्नावर भलतंच उत्तर; नेमकं काय घडलं?
Champions Trophy 2025 Suresh Raina Prediction For Player of the Tournament prefers Shubman Gill
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सुरेश रैनाचं मोठं भाकीत! विराट-रोहित नव्हे तर ‘हा’ खेळाडू ठरणार स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
India vs England 5th T20 LIVE Score Updates in Marathi
IND vs ENG 5th T20I Live Score : भारताला पाचवा धक्का! हार्दिक पंड्या ९ धावांवर बाद
U19 World Champion Trisha Gongadi Story Her Father Dream of Making Her Cricketer
U19 World Champion G Trisha Story: २ वर्षांची असल्यापासून गिरवले क्रिकेटचे धडे, वडिलांनी दिली प्लास्टिक बॅट अन्… भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन त्रिशाची कहाणी
U19 T20 WC 2025 Gongadi Trisha break Shweta Sehrawat most runs record in tournament
U19 T20 WC 2025 : गोंगाडी त्रिशाने घडवला इतिहास! महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषकात केला मोठा पराक्रम
India Women's Won U19 T20 World Cup 2025 2nd Time in a Row vs South Africa
India Won U19 Women’s T20 WC: भारताच्या महिला संघाने घडवला इतिहास, सलग दुसऱ्यांदा पटकावले U19 टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद

श्रीलंकेने अवघ्या २४१ धावा केल्या

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ४९.३ षटकांत सर्व गडी गमावून २४१ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी अफगाणिस्तानला ५० षटकात २४२ धावा कराव्या लागतील. श्रीलंकेसाठी कोणत्याही फलंदाजाने मोठी खेळी खेळली नाही, परंतु सर्वांच्या माफक योगदानामुळे संघाने २०० धावांचा टप्पा पार करता आला. पाथुम निसांकाने चांगली फलंदाजी केली. कर्णधार कुसल मेंडिसने ३९ आणि सदिरा समरविक्रमाने ३६ धावांचे योगदान दिले. शेवटी तिक्षणाने २९ धावांची श्रीलंकेच्या धावांत भर घातली. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकीने शानदार गोलंदाजी केली, त्याने सर्वाधिक चार विकेट्स घेत लंकेचे कंबरडे मोडले. मुजीब उर रहमानने दोन गडी बाद केले. अजमतुल्ला आणि राशिद खान यांना प्रत्येकी एक विकेट या दोघांना मदत केली.

सलग दोन विजयांनी आत्मविश्वास दुणावलेल्या श्रीलंकेला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय आवश्यक आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तानने आतापर्यंत पाच सामन्यांमध्ये प्रत्येकी दोन-दोन विजय नोंदवले आहेत आणि ते दोघेही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील आणि इतर सामन्यांचे निकाल त्यांच्यासाठी अनुकूल असावेत, अशी प्रार्थनाही करावी लागेल. मात्र, या सामन्यात एकच संघ जिंकेल आणि अशा स्थितीत दुसऱ्या संघाची उपांत्य फेरीत पोहचण्याची शक्यता जवळपास संपुष्टात येईल.

हेही वाचा: IND vs ENG: शोएब अख्तरने भारताचे कौतुक करताना इंग्लंडच्या ‘बझबॉल क्रिकेट’ पद्धतीवर केली सडकून टीका; म्हणाला, “हे टी२० सारखे…”

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत

अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.

श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक /कर्णधार), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महेश तिक्षणा, कसून राजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका.

Story img Loader