AFG vs NZ Test match: अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ न्यूझीलंडविरूद्ध एक कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना भारतातील ग्रेटर नोएडा स्टेडियम येथे होणार आहे. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील ऐतिहासिक एकमेव कसोटी सामन्याचा पहिला दिवस वाया गेला आहे. शहीद विजयसिंग पथिक क्रीडा संकुलातील पाण्याचा निचरा करण्याची खराब पद्धत, ओले आउटफिल्ड आणि दयनीय सुविधांमुळे कसोटी सामन्याचा पहिला दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. दोन्ही देशांमधील पहिल्या कसोटीच्या तयारीला पावसाचा फटका बसला आणि न्यूझीलंडला एकही सराव नीट पूर्ण करता आला नाही.

रात्रीच्या रिमझिम पावसाशिवाय सोमवारी दिवसभर पाऊस पडला नाही, मात्र आधुनिक सोयीसुविधांचा अभाव असल्याने मैदान तयार करण्यासाठी अननुभवी मैदान सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. ओली आउटफील्ड सुकवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पंख्यांचा वापर केला. त्यानंतर खेळपट्टीवर रोलर फिरवला तरी देखील खेळपट्टी ना पुरेश सुकली ना सेट झाली. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेल सुरू करता आला नाही.दिवसभरात पंचांनी सहा वेळा पाहणी केली, पण अखेरीस पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. यानंतर अफगाणिस्तान संघाच्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
India Captain: रोहित शर्मानंतर कोण होणार भारताचा तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधार? माजी भारतीय खेळाडूने सांगितली दोन नावं
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

हेही वाचा – Saina Nehwal: ऑलिम्पिक पदक गिफ्ट मिळालं म्हणणाऱ्यांवर सायना नेहवालचा संताप; म्हणाली, “आधी ऑलिम्पिकसाठी…”

पाऊस नसतानाही आऊटफिल्ड ओली

कर्णधार टीम साऊदी, अष्टपैलू मिचेल सँटनर आणि रचिन रवींद्र यांच्यासह न्यूझीलंडचे अनेक खेळाडू मैदानाची पाहणी करण्यासाठी आले होते. पण मिड-ऑन आणि मिड-विकेट हा चिंतेचा विषय होता, तर ३०-यार्ड वर्तुळातही बरेच पॅच ओले होते. एकदा का चांगला सूर्यप्रकाश आला की सामना सुरू होईल असे वाटले पण तसे होऊ शकले नाही.

अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट देखील मैदानाची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नाराज दिसले. दुपारी १ नंतर सुपर सोपर्स देखील बसविण्यात आले. अखेर पहिल्या दिवशी दुपारी ४ वाजता पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. नाणेफेक दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता होणार होती परंतु आज दुसऱ्या दिवशीही पावसामुळे अद्याप नाणेफेक झाली नाही.

हेही वाचा – ENG vs SL: WTC Points Table मध्ये मोठी उलथापालथ, पराभवानंतर इंग्लंड टॉप-५ मधून बाहेर; श्रीलंकेने घेतली मोठी झेप

अफगाणिस्तानचा संघ नाखूश

एसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘इथे कोणतीही सुविधा नाही, आम्ही इथे परत येणार नाही. आमची पहिली पसंती लखनौला असेल. इथे साध्या सुविधाही नाहीत. या ठिकाणी संपूर्ण गैरव्यवस्थापन आहे. इतकंच नव्हे तर खेळाडूही प्रशिक्षण सुविधा आणि सर्व गोष्टींबाबत खूश नाहीत.”

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडमधील कसोटी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नसली तरी ती आयसीसीशी संलग्न आहे. ग्रेटर नोएडा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी द्वारे संचालित, स्टेडियमने २०१६ मध्ये पिंक बॉल दुलीप ट्रॉफी सामना आयोजित केला होता. तथापि, कॉर्पोरेट सामन्यांदरम्यान मॅच फिक्सिंगमुळे बीसीसीआयने सप्टेंबर २०१७ मध्ये त्यावर बंदी घातली होती. तेव्हापासून येथे बीसीसीआयशी संलग्न मॅच आयोजित करण्यात आलेली नाही. हे स्टेडियम उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत येत नाही,

हेही वाचा – Duleep Trophy 2024: आकाशदीपला मोहम्मद शमीने दिला होता गुरूमंत्र, दुलीप ट्रॉफीतील सामन्यात ९ विकेट्स घेतल्यानंतर केला खुलासा

अफगाणिस्तानचा कर्णधार काय म्हणाला?

न्यूझीलंडविरूद्धचा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदी म्हणाला की, “भारत हे आमचे घर आहे आणि जेव्हा आम्ही संघांचे यजमानपद भूषवतो, तेव्हा इतर राष्ट्रांनी येथे अधिक क्रिकेट खेळले आहे. आशा आहे की, आम्हाला इथे भारतात चांगले ठिकाण मिळेल आणि जर आम्ही स्वतःला एका ठिकाणापुरते मर्यादित ठेवले तर ते आमच्यासाठी प्रभावी ठरेल. आशा आहे की, एसीबी आणि बीसीसीआय आम्हाला चांगले मैदान मिळवून देतील.