AFG vs SL Emerging Asia Cup: अफगाणिस्तानच्या वरिष्ठ संघाबरोबच अफगाणिस्तानचा ज्युनियर संघही तितकाच जबरदस्त आहे. अफगाणिस्तान अ संघाने इतिहास घडवला असून संघ आता आशिया चॅम्पियन ठरला आहे. त्यांनी इमर्जिंग आशिया चषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव प्रथमच विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला होता. अफगाणिस्तानचा संघ प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता आणि थेट जेतेपदावर त्यांनी आपले नाव कोरले.

अफगाणिस्तानचा वरिष्ठ संघही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला धुमाकूळ घालत आहे. विश्वचषक असो वा मालिका असो अफगाणिस्तानचा संघाने आपल्या उथ्कृष्ट कामगिरीने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकासारख्या बलाढ्य देशांना पराभवाचा धक्का दिला आहे. २०२३मध्ये झालेल्या वनडे विश्वचषकात तर संघ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पोहोचला होता. आता त्यांच्यानंतर अफगाणिस्तानचा ज्युनियर संघही हाच वारसा पुढे चालवत आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
IND vs PAK Hong Kong Super 6 Pakistan Beat India by 7 Wickets Robin Uthappa Manoj Tiwary
IND vs PAK: पाकिस्तानने ५ षटकांत भारताचा केला पराभव, एकही विकेट न गमावता गाठले १२० धावांचे लक्ष्य
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
IND vs NZ AB de Villiers statement on Virat Kohli and Team India
IND vs NZ : ‘आता तो काळ गेला…’, लाजिरवाण्या पराभवानंतर विराटसह टीम इंडियाबद्दल एबी डिव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…

टी-२० इमर्जिंग आशिया चषक २०२४ च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार नुवानिंदू फर्नांडोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानविरुद्ध प्रथम खेळताना श्रीलंकेने २० षटकांत ७बाद १३३ धावा केल्या आणि अफगाणिस्तान संघाला विजयासाठी १३४ धावांचे लक्ष्य मिळाले.

अफगाणिस्तान संघाने १८.१ षटकात ३ गडी गमावत १३४ धावा करत हे लक्ष्य गाठले आणि सामना ७ गडी राखून जिंकला. या विजयासह अफगाणिस्तानने प्रथमच इमर्जिंग आशिया कप चॅम्पियन होण्याचा मानही मिळवला. या सामन्यात अफगाणिस्तानचा गोलंदाज अल्लाह गझनफरला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले, तर सेदीकुल्लाह अटलला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताब मिळाला. विजयाचे मोठे दावेदार मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघही सहभागी झाला होता, मात्र अफगाणिस्तानने कमाल केली.

हेही वाचा – IPL 2025 Retention Live मोफत कुठे पाहता येणार? दिवाळीदिवशी होणार रिटेन-रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर

अफगाणिस्तान संघाने दुसऱ्या डावात संघाच्या खात्यात एकही धाव जोडली नसताना पहिली विकेट गमावली, मात्र यानंतर सेदिकुल्ला अटलने संघाचा डाव उचलून धरत ५५ चेंडूत ५५ धावांची खेळी केली आणि संघाला विजयापर्यंत नेले. अंतिम सामन्यात दरविश रसूलीने २४ धावा केल्या तर करीम जनातने ३३ धावांची शानदार खेळी केली. मोहम्मद इशाकने ६ चेंडूत १६ धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. अटलही ५५ धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला आणि विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली आणि अवघ्या १५ धावांवर संघाच्या ४ विकेट पडल्या. यानंतर सहान अराच्चिगेने संघासाठी महत्त्वाची खेळी खेळली आणि अर्धशतक झळकावले, मात्र त्याला संघाच्या इतर फलंदाजांची साथ मिळू शकली नाही. पवन रत्नायकेने २० धावांचे योगदान दिले तर खालच्या फळीतील फलंदाज निमेश विमुक्तीनेही १९ चेंडूंत २३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सहानने शानदार फलंदाजी करत ४७ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून बिलाल सामीने ३ तर अल्लाह गझनफरने २ विकेट घेतले.

Story img Loader