Afghanistan Rahmanullah Gurbaz Century Virat Kohli Sachin Tendulkar Record: अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. अफगाणिस्तान संघाने ही मालिका २-१ ने जिंकली आहे. अफगाणिस्तानने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चमकदार कामगिरी करत बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाजने दणदणीत शतक झळकावले आहे. त्याच्या या शतकाच्या जोरावर संघाने या सामन्यात विजय मिळवला आणि मालिकाही नावे केली. रहमानुल्ला गुरबाजने या शतकासह नवा विक्रम केला आहे.

रहमानुल्ला गुरबाजचे या वर्षातील हे तिसरे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. तर हे त्याच्या कारकिर्दीतील ८वे एकदिवसीय शतक होते. या शतकासह गुरबाजने टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहलीला एका खास विक्रमात मागे टाकले. त्याचबरोबर त्याने सचिन तेंडुलकरचीही बरोबरी केली आहे.

Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
लक्षवेधी लढत : यशोमती ठाकूर यांच्यासमोर भाजपचे आव्हान
KL Rahul Statement on Sanjiv Goenka Animated Chat in IPL 2024 loss Said Wasn’t the nicest thing Ahead
KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य
Dr Sachin Pavde become X factor against MLA Dr Pankaj Bhoir and Shekhar Shende
डॉ. सचिन पावडे ठरताहेत ‘ एक्स ‘ फॅक्टर, आघाडी व युतीस धास्ती.
Indian Cricket Team Creates History Becomes First Team To Score 5 T20I International Century in 2024 IND vs SA Tilak Varma
IND vs SA: तिलक वर्माच्या शतकासह भारतीय संघाने घडवला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
Gautam Gambhir Backs KL Rahul With Big Statement Said How Many Teams Have a Player Like Him Border Gavaskar Trophy
Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

हेही वाचा – IND vs SA: “आता उभा राहून मजा बघ…”, हार्दिक पंड्याला मोठेपणा करणं पडलं भारी, अर्शदीपला बोललेल्या वाक्यानंतर होतोय ट्रोल

गुरबाजने विराटला टाकलं मागे

गुरबाजच्या आठव्या एकदिवसीय शतकासह त्याने कोहलीला मागे टाकलं आहे, परंतु तो महान सचिन तेंडुलकरला मागे टाकू शकला नाही. गुरबाजने ४६ डावांमध्ये आठवे वनडे शतक झळकावले आहे. याशिवाय त्याने वयाच्या २२ व्या वर्षी ८ वनडे शतके झळकावली आहेत. फक्त सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने इतक्या कमी वयात ८ शतके झळकावली होती. या वयाचा असताना विराट कोहलीने ७ वनडे शतकं केली होती. गुरबाज आता या यादीत विराट कोहलीच्या पुढे गेला आहे. याशिवाय, गुरबाज सर्वात कमी एकदिवसीय डावात ८ शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – Champions Trophy: “भारत-पाकिस्तान सामनाच नाही झाला तर…”, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येणार नसल्याने BCCI, ICCवर संतापले जावेद मियांदाद

सर्वात कमी वयात ८ वनडे शतकं झळकावणारे फलंदाज

२२ वर्षे – ३१२ दिवस – क्विंटन डिकॉक – ८ शतकं
२२ वर्षे – ३४९ दिवस – रहमानुल्ला गुरबाज – ८ शतकं
२२ वर्षे – ३५७ दिवस – सचिन तेंडुलकर – ८ शतकं
२३ वर्षे – ०२७ दिवस – विराट कोहली – ८ शतकं
२३ वर्षे – २८० दिवस – बाबर आझम – ८ शतकं

हेही वाचा – KL Rahul: “मला थोडं स्वातंत्र्य मिळेल अशा संघात…”, केएल राहुलचे लखनौने रिलीज केल्यानंतर मोठं वक्तव्य, संघ सोडण्यामागचं सांगितलं कारण

८ एकदिवसीय शतकं गाठण्यासाठी सर्वात कमी डाव

हाशिम आमला – ४३ डाव
बाबर आझम – ४४ डाव
रहमानुल्ला गुरबाज – ४६ डाव
इमाम उल हक – ४७ डाव
क्विंटन डी कॉक – ५२ डाव
कॅलम मॅकलियोड – ५६ डाव
शिखर धवन – ५७ डाव

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महमुदुल्लाहच्या ९८ आणि मेहदी हसन मिराझच्या ६६ धावांच्या जोरावर त्यांनी ५० षटकांत २४४ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी अफगाणिस्तानला २४५ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. प्रत्युत्तरात अफगाण संघाने ४८.२ षटकांत केवळ ५ गडी गमावून २४६ धावा केल्या आणि सामना ५ विकेटने जिंकला.