Afghanistan vs England Highlights in Marathi: अफगाणिस्तान संघाचा आयसीसी स्पर्धेत अजून एक मोठा उलटफेर केला आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडचा चॅम्पियन्स ट्रॉफीत ८ विकेट्सने पराभव करत मोठा अपसेट केला. यासह इंग्लंडचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर अफगाणिस्तानचा संघ अजूनही उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीत कायम आहे. अफगाणिस्तानकडून अझमतुल्ला उमरझाईने ५ विकेट्स तर इब्राहिम झादरानने १७७ धावांची खेळी केली, जे संघाच्या विजयाचे हिरो ठरले.
इब्राहिम झद्रानचे (१७७) शानदार शतक आणि अझमतुल्ला ओमरझाई (४१ धावा आणि ५ विकेट) याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात इंग्लिश संघाचा अवघ्या ८ धावांच्या फरकाने पराभव केला.
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि अफगाणिस्तानने पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेत ३०० धावांचा पल्ला पार केला. यासह अफगाणिस्तानने ३२५ धावांचा टप्पा गाठला. इब्राहिम झादरानची १७७ धावांची वादळी खेळीने संघाच्या या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. अखेरच्या दोन षटकांमध्ये म्हणजेच १२ चेंडूत इंग्लंडला १६ धावांची गरज होती. फजलहकने त्या षटकात आर्चरला बाद करत ३ धावा दिल्या. तर अखेऱच्या षटकात उमरझाईने प्रत्येक चेंडूवर एकेक धाव देत पाचव्या चेंडूवर आदिल रशीदला बाद करत इंग्लिश संघाला सर्वबाद केले आणि संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन्ही संघांची सुरुवात खराब झाली. पण अफगाणिस्तानने कमालीचं पुनरागमन करत ३२५ धावा केल्या. झादरानने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानसाठी पहिलं शतक झळकावले आणि त्यानंतर या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळी खेळताना १७७ धावा केल्या. अफगाणिस्तानने ९व्या षटकातच संघाने ३ विकेट गमावल्या. हे तीन विकेट स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने घेत अफगाणिस्तानला अडचणीत आणले. पण इथून इंग्लंडच्या गोलंदाजीची अवस्था बिकट झाली आणि अफगाणिस्तानने पुनरागमन केले.
अफगाणिस्तानने ३७ धावांत ३ विकेट गमावल्यानंतर इब्राहिम झादरानने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीबरोबर शतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. शाहीदीने ४० धावा केल्या. तर यानंतर अझमतुल्ला ओमरझाईने ४१ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. यानंतर मोहम्मद नबीने तर इंग्लिश संघाची धुलाई करत २४ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकारांसह ४० धावा केल्या. झादरान आणि नबीने २०० च्या स्ट्राईक रेटने ५० चेंडूत शतकी भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. इंग्लंडकडून आर्चरने ३ विकेट्स, ओव्हरटन, रशीदने १-१ तर लिव्हिंगस्टोनने २ विकेट्स घेतले.
?????????? ?????? ?? ??????! ?#AfghanAtalan celebrate a clinical victory at the ICC #ChampionsTrophy over England. ?
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) February 26, 2025
?: ICC/Getty#AFGvENG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/s61QUNoSp8
अफगाणिस्तानने दिलेल्या ३२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात थोडी चांगली झाली, पण संघाचे सलामीवीर मोठी खेळी करू शकले नाही. सॉल्ट १२ धावा तर जेमी स्मिथ ९ धावा करत बाद झाले. जो रूटने १२० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकले नाही. हॅरी ब्रुक २५ धावा, बटलर ३८ धावा, लिव्हिंगस्टोन १० धावा तर ओव्हरटनने ३२ धावा केल्या. पण अफगाणिस्तानच्या भेदक गोलंदाजीपुढे संघ ३१७ धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानकडून अझमतुल्ला ओमरझाईने ५ विकेट्स, नबीने २ विकेट्स, तर फजलहक फारूकीने १, नूर अहमदने १ तर गुलबदीन नायबने १ विकेट घेतली.