आशिया कप स्पर्धेच्या ‘सुपर फोर’ फेरीसाठी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा श्रीलंकेविरोधात खेळताना थोडक्यात पराभव झाला. या पराभवानंतर अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी सुपर फोरमध्ये न पोहचण्याबाबत मोठा दावा केला. “श्रीलंकेने आम्हाला २९२ धावांचं लक्ष्य दिलं. मात्र, सुपर-४ साठी पात्र होण्यासाठी हे लक्ष्य आम्हाला ३७.१ षटकात गाठायचं आहे हे गणित आम्हाला कुणीही सांगितलं नाही”, असा दावा जोनाथन ट्रॉट यांनी केला. यामुळे श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तानचा हा सामना चर्चेचा विषय ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २९१ धावांची मजल मारली. धनंजय डिसिल्व्हाने ९२ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून गुलबदीन नईबने ४ विकेट्स घेतल्या. अफगाणिस्तानतर्फे हशमतुल्ला शाहिदी (५९) आणि मोहम्मद नबी आहे (६५) यांनी विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले.

नेमकं काय घडलं?

श्रीलंकेने आशिया कप स्पर्धेच्या सुपर ४ फेरीसाठीच्या सामन्यात अफगाणिस्तानसमोर २९२ धावांचं लक्ष्य ठेवलं. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तान संघाने ३७ षटकांमध्ये २८९ धावा केल्या. यानंतरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर अफगाणिस्तानची विकेट गेली. यानंतर फजल हक फारुकीने दोन चेंडू विनाधाव खेळले. यात एक चेंडू फुलटॉस होता. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर फारुकी बाद झाला. आणि अफगाणिस्तानला सर्वबाद २८९ धावाच करता आल्या.

या पराभवानंतर अफगाणिस्तानचे कोच जोनाथन ट्रॉट म्हणाले, “आशिया कपच्या सुपर-४ फेरीसाठी पात्र होण्यासाठी श्रीलंकेने दिलेलं लक्ष्य आम्हाला ३७.१ षटकात गाठायचं आहे हे माहिती होतं. मात्र त्यानंतरही गणितीय समीकरणांद्वारे जिंकण्याची संधी होती याची कल्पना आम्हाला देण्यात आली नाही.”

सुपर-४ फेरीत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आमनेसामने असतील.

शेवटच्या तीन चेंडूने सुपर ४ पात्रतेवर काय परिणाम झाला असता?

सुपर ४ फेरीच्या समीकरणाची माहिती अफगाणिस्तानला माहिती असते आणि त्यानुसार शेवटच्या तीन चेंडूपैकी एका चेंडूवर षटकार गेला असता, तर अफगाणिस्तान सुपर ४ फेरीसाठी पात्र ठरला असता.

हेही वाचा : राहुल, सूर्यकुमारला विश्वचषकाचे तिकीट! भारताचा १५ सदस्यीय प्राथमिक संघ जाहीर; तिलक, प्रसिधला वगळले

अफगाणिस्तान नेमकं कुठं चुकलं?

अफगाणिस्तानकडून श्रीलंकेने दिलेलं २९२ धावांचं लक्ष्य गाठताना चांगला खेळत असणारा रशीद खान नॉन स्ट्रायकिंग एन्डला होता. त्यामुळे त्याला खेळण्याची संधीच न मिळाल्याने अफगाणिस्तानला त्याचा फटका बसला. रशीद खानला खेळण्याची संधी मिळाली असती आणि त्याने अखेरच्या तीन चेंडूत तडाखेबाज खेळी करत षटकार मारला असता, तर अफगाणिस्तान सुपर ४ फेरीसाठी पात्र ठरला असता.