अफगाणिस्तानचा संघ वर्ल्डकपमध्ये एकावर एक धक्के देत आहे. राजधानी दिल्लीत गतविजेत्या इंग्लंडला चीतपट केल्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानवर दिमाखदार विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानच्या विजयात भारतीय शिलेदारांचं मोलाचं योगदान आहे. अफगाणिस्तानने वर्ल्डकपसाठी भारताच्या मिलाप मेवाडा यांना फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं. भारतात दाखल झाल्यानंतर काही तासात अफगाणिस्तान संघव्यवस्थापनाने मेन्टॉर म्हणून भारताचे माजी खेळाडू अजय जडेजा यांना ताफ्यात दाखल करुन घेतलं.

मेवाडा हे बडोद्याचे माजी यष्टीरक्षक फलंदाज आहेत. वर्ल्डकपआधी अफगाणिस्तानची बांगलादेशविरुद्ध मालिका आयोजित करण्यात आली होती. त्यावेळीच बोर्डाने त्यांची नियुक्ती केली. पण ती नियुक्ती त्या मालिकेपुरती मर्यादित होती. पण वर्ल्डकप भारतातच होणार आहे हे लक्षात घेऊन अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मेवाडा यांची वर्ल्डकप मोहिमेसाठी निवड केली. आशिया चषकावेळीही ते संघाबरोबर होते.

Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Narendra Modi Syria
सीरियावर बंडखोरांचा ताबा; भारताची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “देशाची अखंडता जपण्यासाठी…”
IND vs AUS Controversial Umpiring Over R Ashwin LBW Appeal as Mitchell Marsh Given Out KL Rahul DRS b
IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?
India Beat Sri Lanka by 7 Wickets in Semifinal and Enters Final of U19 Asia Cup
IND U19 vs SL U19: भारताचा U19 संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत, १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीने २४ चेंडूत केलं अर्धशतक; अंतिम फेरीत कोणाविरूद्ध खेळणार?
India australia pink ball test match review in marathi
‘गुलाबी’ आव्हानासाठी सज्ज; प्रकाशझोतातील कसोटी आजपासून; भारताचे आघाडी दुपटीचे लक्ष्य
match review india vs australia pink ball second test in adelaide
‘गुलाबी’ आव्हानासाठी सज्ज; प्रकाशझोतातील कसोटी आजपासून; भारताचे आघाडी दुपटीचे लक्ष्य

जम्मू काश्मीर आणि हैदराबाद संघाचे प्रशिक्षक म्हणून मेवाडा यांनी काम पाहिलं आहे. बडोदा क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांचं नाव अमोल मुझुमदार आणि मुकुंद परमार यांच्याबरोबरीने चर्चेत होते. बडोदा संघटनेनं परमार यांची नियुक्ती केली. अफगाणिस्तान संघाचं शिबीर अबूधाबीत आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी मेवाडा संघाबरोबर होते. ४८वर्षीय मेवाडा यांनी ११ प्रथम श्रेणी तर २६ लिस्ट ए सामने खेळले आहेत. अनेक युवा खेळाडूंच्या वाटचालीत त्यांची मोलाची भूमिका आहे. त्यांच्या मार्गदर्शनात जम्मू काश्मीर संघाने २०१९-२० रणजी हंगामात उपउपांत्य फेरी गाठली होती. आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने अब्दुल समद या युवा तडाखेबंद फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला रिटेन केलं होतं. काश्मीर संघाला मार्गदर्शन करताना समदचं नैपुण्य मेवाडा यांनी हेरलं होतं. त्यांनीच सनरायझर्स संघाचे मेन्टॉर आणि भारताचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे समदच्या नावाची शिफारस केली. मेवाडा यांच्या विनंतीला मान देत सनरायझर्स संघव्यवस्थापनाने समदला रिटेन केलं होतं.

मेवाडा यांच्या बरोबरीने अफगाणिस्तानने अजय जडेजा यांच्या अनुभवाचा उपयोग करून घ्यायचं ठरवलं. १५ कसोटी, १९६ वनडे इतका प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या जडेजा यांना समाविष्ट केलं. भारतीय खेळपट्ट्या आणि वातावरण याची जडेजा यांना पूर्ण कल्पना आहे. खेळाडू म्हणून अनेक वर्ष खेळण्याच्या बरोबरीने समालोचक आणि तज्ज्ञ म्हणूनही त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. अजय यांनी १९९२, १९९६, १९९६ अशी तीन वर्ल्डकपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. मोठ्या स्पर्धेत तसंच अव्वल संघांविरुद्ध खेळताना खेळात काय बदल करावे लागतात याची जाण जडेजा यांना आहे.

इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट अफगाणिस्तानचा मुख्य प्रशिक्षक आहे. रईस अहमदझाई सहाय्यक प्रशिक्षक आहेत. रियान मरोन क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत. हमीद हसन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. जेसन डग्लस स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक आहेत.

आणखी वाचा: रेफ्युजी कॅम्पमधून सुरुवात, भारतात होम ग्राऊंड, देशात तालिबानी राजवट-अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंची संघर्षमय वाटचाल

कोचिंग स्टाफच्या बरोबरीने अफगाणिस्तान संघासाठी भारतात खेळणं नवीन नाही हेही लक्षात घ्यावं लागेल. युएई आणि श्रीलंकेतील दंबुला इथे खेळल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यानुसार ग्रेटर नोएडातील ग्रेटर नोएडास्थित शहीद विजय सिंग पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अफगाणिस्तानला देण्यात आलं. २०१७ मध्ये अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्धची पाच सामन्यांची मालिका इथेच आयोजित केली. नामिबियाविरुद्धचे काही सराव सामनेही इथे खेळवण्यात आले. या मैदानावर एक अवैध लीग खेळवण्यात आल्याने बीसीसीआयने या मैदानाला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं. त्यामुळे अफगाणिस्तानला होम ग्राऊंड बदलावं लागलं. ते डेहराडून इथे राजीव गांधी स्टेडियमवर खेळू लागले. त्यानंतर लखनौ इथे अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवरही त्यांनी सामने खेळले.

राजधानी दिल्लीतल्या लाजपत नगर भागाला मिनी काबूल म्हटलं जातं. अफगाण नागरिकांच्या वास्तव्यामुळे हे नाव मिळालं आहे. अफगाणी पद्धतीचं खाणंपिणं मुबलक प्रमाणावर इथे मिळतं. त्यांची संस्कृती अनुभवायला मिळते. दिल्लीत अफगाणिस्तानमधील मुलं शिकण्यासाठी दरवर्षी येत असतात. दिल्लीच्या अन्य काही भागातही अफगाणिस्तानचे नागरिक राहतात. इंग्लंडविरुद्धच्या विजयात या पाठिंब्याचाही मोठा वाटा होता. चेन्नईत झालेल्या लढतीवेळीही अफगाणिस्तानचे चाहते आवर्जून उपस्थित होते.

Story img Loader