Afghanistan cricket team to tour India in January 2023 : विश्वचषक संपल्यानंतर जगभरातील क्रिकेट संघांनी द्विपक्षीय मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. एकीकडे भारतीय संघ ऑस्ट्रेलियन संघासोबत टी-२० मालिका खेळणार आहे, तर दुसरीकडे असा संघ भारतात येणार आहे, ज्यांच्यासोबत भारताने आतापर्यंत एकही वनडे किंवा टी-२० मालिका खेळलेली नाही. हा संघ दुसरा कोणी नसून अफगाणिस्तान क्रिकेट संघ आहे. अफगाणिस्तानचा संघ पुढील वर्षी जानेवारीत भारत दौऱ्यावर येणार आहे, याची घोषणा बोर्डानेच केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वास्तविक, त्याची चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती आणि आता कार्यक्रमही जाहीर झाला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात जानेवारीमध्ये तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या दौऱ्यासाठी मान्यता दिली आहे. या या दौऱ्यात अफगाणिस्तान ११, १४ आणि १७ जानेवारीला तीन टी-२० सामने खेळणार आहे.

तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारी रोजी मोहाली येथे खेळवला जाईल, त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे १४ आणि १७ जानेवारी रोजी इंदूर आणि बंगळुरू येथे होईल. दोन्ही देशांदरम्यान पहिल्यांदाच मर्यादीत षटकांची मालिका होणार आहे. अफगाणिस्तान आणि भारताचे संघ केवळ आयसीसी स्पर्धा किंवा आशिया चषकादरम्यान मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. मात्र, आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये केवळ एकच कसोटी सामना खेळला गेला आहे.

हेही वाचा – World Cup 2023: आयसीसीकडून विश्वचषकात सर्वोतम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची यादी जाहीर, ‘या’ टीमने मारली बाजी

अफगाणिस्तानने अलीकडेच आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी भारताचा दौरा केला, जिथे त्यांनी इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्ध संस्मरणीय विजय नोंदवून गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले होते.जर आपण दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड सामन्यांबद्दल बोललो, तर ते आतापर्यंत पाच टी-२० सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत, त्यापैकी सर्व भारताने जिंकले आहेत. अफगाणिस्तानच्या विश्वचषकातील कामगिरीचे खूप कौतुक होत आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचे वेळापत्रक –

पहिला सामना- ११ जानेवारी २०२३, मोहाली
दुसरा सामना- १४ जानेवारी २०२३, इंदूर
तिसरी सामना- १७ जानेवारी २०२३, बंगळुरू

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afghanistan cricket team to tour india in january 2023 for a three match t20i series vbm
Show comments