Afghanistan Fan Misbehaves With Shaheen Afridi : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ पूर्वी पाकिस्तानचा संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. जिथे दोन्ही संघांत तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाक आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी पार पडला. यादरम्यान अफगाणिस्तानच्या एका चाहत्याने पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीसोबत गैरवर्तन केले. यानंतर शाहीन स्वतः त्या फॅन्सवर संतापलेला दिसला. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायर होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिओ न्यूजनुसार, शाहीन ड्रेसिंग रूममधून मैदानाकडे जात असताना ही घटना घडली. २४ वर्षीय वेगवान गोलंदाजाने सुरुवातीला अफगाण चाहत्याने वापरलेल्या अपमानास्पद भाषेकडे दुर्लक्ष केले. यानंतर तो चाहता जेव्हा एवढ्यावरच थांबला नाही, तेव्हा त्याने स्वतःच पहिल्यांदा चाहत्याला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर शाहीन तेथून निघून गेला.

यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना माहिती दिली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत त्या चाहत्याला तेथून बाहेर हाकलले. त्या चाहत्याला मैदानाबाहेर पाठवण्यात आले. या घटनेचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सुरक्षा कर्मचारी चाहत्याला मैदानातून बाहेर काढताना दिसत आहेत. यादरम्यान धक्काबुकी होताना दिसत आहे.

हेही वाचा – Match Fixing : चेन्नई-राजस्थान सामना ‘फिक्स’ होता का? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सेहवागने उपस्थित केले गंभीर प्रश्न

तत्पूर्वी पाकिस्तानने रविवारी आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात आयर्लंडचा सात गडी राखून पराभव करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यादरम्यान शाहीन आफ्रिदीने मोठी कामगिरी केली. आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगला बाद केल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० बळीही पूर्ण केले. परंतु, या दरम्यान तो बराच महागडा ठरला. शाहीन आफ्रिदीने ४ षटकात ४९ धावा देत ३ बळी घेतले. मालिकेतील तिसरा सामना १४ एप्रिल रोजी होणार आहे.

हेही वाचा – IPL 2024 : सलग तिसऱ्या पराभवानंतर संजू सॅमसन नाराज; म्हणाला, ‘माझ्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की जर…’

या मालिकेतील आयर्लंडविरूद्धचा दुसरा सामना जिंकत बाबर आझमने आपल्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पुरुषांच्या टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार ठरला आहे आयर्लंडवरील या विजयासह पाकिस्तान संघाने बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील ४५ वा टी-२० सामना जिंकला. यासह, त्याने अनेक दिग्गज कर्णधारांना मागे टाकले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afghanistan fan abuses and misbehaves with pakistans shaheen afridi in ireland video viral during ire vs pak 2n t20i vbm